छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): भारतीय शालेय खेळ महासंघ S.G.F.I. व क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने 68वी राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल 19 वर्षे मुले व मुली क्रीडा स्पर्धा चे आयोजन दिनांक 24 ते 25 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे यशस्वी आयोजन आज रोजी संपन्न झाले.
स्पर्धेचे शेवटच्या दिवशी दिनांक 27 जानेवारी 2025 रोजीच्या सकाळच्या सत्रामध्ये बक्षिस वितरण खासदार डॉ. भागवत कराड,राज्यसभा सदस्य यांचे शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी . मकरंद जोशी, शिवछत्रपती पुरस्कारार्थी,प्रदिप तळवळकर, सचिव, महाराष्ट्र सॉफ्टबॉल, युवराज नाईक, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, छत्रपती संभाजीनगर विभाग, नटवर सिंह, एस.जी.एफ. आय, किशोर चौधरी, साकेर अली, एस.जी.एफ.आय. राजस्थान, सुबोध मिश्रा, एस.जी.एफ.आय.राजस्थान, विजय गौर, एस.जी.एफ.आय. दिल्ली, मृत्युंजय शर्मा ,एस.जी.एफ.आय.छत्तीसगढ बाजीराव देसाई, जिल्हा क्रीडा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी खासदार डॉ. भागवत कराड,राज्यसभा सदस्य यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना खेळामुळे आरोग्य निरोगी राहून सांघिक खेळामुळे एकात्मता वाढील लागते असे मनोगत व्यक्त करून विजेत्या संघांना शुभेच्छा देऊन सहभागी संघांना प्रयत्नात सातत्य ठेवावे असे सांगितले.
अंतिम निकाल
19 वर्षाखालील मुले
1. महाराष्ट्र
2. CBSE
3. छत्तीसगड.
19 वर्षाखालील मुली
1. महाराष्ट्र
2. दिल्ली
3. छत्तीसग
स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून आज झालेल्या सामन्यासाठी पंच प्रमुख अक्षय येवले,शिवाजी पाटील, विकास वानखेडे, कल्पेश कोल्हे, प्रज्वल जाधव, मंगेश इंगोले, मयुरेश औसेकर, प्रविण गडका,गणेश बेटूदे,अक्षय बिरादार व पंच सहाय्यक सचिन बोर्डे,भीमा मोरे, रोहीत तूपारे, यश थोरात, निखील वाघमारे, गौरव साळवे, मयुरी गामके, ईश्वरी शिंदे, मयुरी चव्हाण, सायली किरगत, विशाल जारवाल, कार्तीक तांबे, शुभम जारवाल, गौरव खरे यांनी भूमिका निभावली.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, छत्रपती संभाजीनगर व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व तालुका क्रीडा अधिकारी गीता साखरे, क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाणे,लता लोंढे, खंडू यादवराव, रामकिशन मायंदे, गणेश पाळवदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक पूनम नवगिरे, सचिन पुरी, वरीष्ठ लिपिक सदानंद सवळे, अनिल दांडगे, सचिन बोर्डे, क्रीडा शिक्षक बी.व्ही. होण्णा, राकेश खैरनार, रफिक जमादार, प्रवीण शिंदे, गणपत पवार,प्रशांत पांडे, राणा कदम, बाजराव भूतेकर,गौरव साळवे, निखिल वाघमारे,शुभम जारवाल, निखिल वाघमारे,सह राज्य संघटना अधिकारी व छत्रपती संभाजीनगर जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सर्व पदाधिकारी आदीं परिश्रम घेतले आहे.