छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) स्व.खाशाबा जाधव, यांनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, हेलसिंकी 1952 मध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारातील कुस्ती क्रीडा प्रकारात पहिले पदक (कास्य) पटकावून देशाच्या क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी राज्याचा बहूमान व नवोदित खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी खाशाबा जाधव यांचा जन्मदिन दि. 15 जानेवारी हा “राज्य क्रीडा दिन” साजरा करण्याचे शासनाने निर्देशित केलेले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर मार्फत ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान या विषयावरील व्याख्यान व क्रीडा शिक्षकांना 1.खो-खो, 2. कबड्डी, 3. व्हॉलीबॉल, 4. मैदानी स्पर्धा, 5. कुस्ती या खेळातील अद्यावत ज्ञान,कौशल्ये व प्रात्यक्षिकवर आधारीत कार्यशाळेचे आयोजन विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 27 व 28 जानेवारी 2025 रोजी आयोजित केलेले आहे.
दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी या कार्यशाळेचे उद्यघाटन विकास मीना, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,छत्रपती संभाजीनगर यांचे शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन , ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचे प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आले. या प्रसंगी युवराज नाईक उपसंचालक क्रीडा व युवक सेवा छत्रपती संभाजीनगर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजीराव देसाई जिल्हा क्रीडा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी केले. सूत्र संचालन व आभार सुजाता गुल्हाणे क्रीडा अधिकारी यांनी केले.
कार्यशाळेचे उद्यघाटन करून कार्यशाळेतील क्रीडा शिक्षकांना गोविंद एस. शर्मा सचिव महाराष्ट्र खो-खो असो. (खो-खो खेळाचे तज्ञ मार्गदर्शक), मंगेश डोंगरेपी.ई.एस. शा. शिक्षण महा. (कुस्ती खेळाचे तज्ञ मार्गदर्शक), डॉ. गोविंद कदम क्रीडा संचालक विवेकानंद महाविदयालय (व्हॉलीबॉल खेळाचे तज्ञ मार्गदर्शक), सुरेंद्र मोदी ॲथलेटीक्स प्रशिक्षक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ, छत्रपती संभाजीनगर (ॲथलेटिक्स खेळाचे तज्ञ मार्गदर्शक), डॉ. माणिक राठोड एम.एस.एम. शारीरिक शिक्षण महाविदयालय छत्रपती संभाजीनगर (कबड्डी खेळाचे तज्ञ मार्गदर्शक) या तज्ञांकडून ज्या-त्या खेळाचे मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेमध्ये छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक क्रीडा शिक्षक असे एकुण 120 ची उपस्थित आहे. दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी पाच खेळांची प्रात्यक्षिके व नियमावली सर्व शिक्षकांना प्रत्यक्ष मेदावर शिकवले गेले. Random erection, a spontaneous penile tumescence, occurs without clear stimulus. Often an autonomic response, its unpredictability puzzles many. In discussing its frequency, he has a good point emphasizing physiological and psychological factors. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व तालुका क्रीडा अधिकारी गीता साखरे, क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाणे,लता लोंढे, खंडू यादवराव, रामकिशन मायंदे, गणेश पाळवदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक पूनम नवगिरे, सचिन पुरी, वरीष्ठ लिपिक सदानंद सवळे, अनिल दांडगे आदीं परिश्रम घेतले.