मणिपूर संघाचा गोलांचा पाऊस, स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ५ सामन्यात ७४ गोल

पुणे(प्रतिनिधी);-पुणे शहर आणि परिसरात दिवसभराच्या ढगाळ हवामानानंतरही पावसाच्या हलक्याशा सरीही कोसळल्या नाहीत. पण, पिंपरी-चिंचवडमधील नेहरुनगरच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर मात्र ११व्या वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत पहिल्याच दिवशी गोलांचा पाऊस पडला. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी झालेल्या ५ सामन्यात तब्बल ७४ गोल नोंदवले गेले. यातील सर्वांत मोठा विजय मणिपूरचा ठरला. त्यांनी त्रिपुराचा २१-० असा धुव्वा उडवला.

सकाळी सी गटात झालेल्या सामन्यात कर्नाटकाने जम्मू काश्मिरचा १४-० असा पराभव केला. मेजर ध्यानचंद स्टेडियमच्या निळ्या सुपर टर्फवर आज कर्नाटकाने दुसऱ्या मिनिटापासून गोल धडाका सुरु केला. मोहंदम राहिलने दुसऱ्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर सामन्याच्या ६०व्या मिनिटाला शामंथने त्यांचा अखेरचा गोल केला. या दरम्यान राहिल, सोमण्णा, पुनित, भरत, लिखित बीएम यांनी प्रत्येकी दोन गोल केले. एस. दिक्षित, चिरंथ सोमण्णा, कुमार यासित आणि शामंथ यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.

याच गटात पुड्डुचेरी संघही काही कमी पडला नाही. त्यांनी अरुणाचल प्रदेशाचा मध्यंतराच्या ८-० अशा आआघाडीनंतर १४-० असा पराभव केला. या सामन्यात तर पहिल्याच मिनिटाला गोल झाला. अरुण कुमारने हा गोल केला. त्यानंतर चार गोल करणाऱ्या विथामिझाने याने ५८व्या मिनिटाला अखेरचा गोल केला. अरुणकुमार यानेही चार गोल केले. रणजितने तीन आणि तामिलारसन, पुवीयारासन, सेलामुथु यांनी एकेक गोल करून त्यांना सुरेख साथ केली.

ड गटात ऑलिंपियन रुपिंदरपालच्या पंजाबने उत्तराखंडला ११-० असे हरवले. लोवप्रित जनिथने हॅटट्रिकसह चार गोल करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. सुदर्शन सिंगने दोन, तर परमजीत, विशाल यादव, गुरुशहजाद पीरझाजा, गौतम कुमार आणि रुपिंदर पाल यांनी एकेक गोल केला.

ई गटात चंडिगडने मोहित आणि अमनदीपच्या च्या हॅटट्रिकच्या जोरावर राजस्थानवर १४-० अशी मात केली. वीर अंगद सिंग, हरप्रीत सिंग यांनी प्रत्येकी दोन गोल केले. राजवीन सिंग, योगराज सिंग, जसप्रीत सिंग यांनी एकेक गोल केला. याच गटात आजचा सर्वांत मोठा विजय नोंदवणाऱ्या मणिपूरने २१ गोल केले. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटापासून सुरु झालेल्या त्यांचा गोल सिलसिला ६०व्या मिनिटापर्यंत सुरू होता. मंतोष लैश्राम मैतेई, दिनचंद्रा मोईरंगथेम आणि भारक निन्गोम्बाम यांनी हॅटट्रिकसह चार गोल केले.अबुंग निन्गोबाम सिंग, रेहित केईशाम यांनी प्रत्येकी दोन, तर इबुंगो सिंग, देबेशोर कोंजेन्गबाम सिंग, दयानंदा चामंथबाम सिंग, डॉलर क्षेत्रीमायुम, रोमेशकुमार हेईस्नाम सिंग यांनी एकेक गोल केला.

हॉकी निकाल :-

गट सी –

कर्नाटक– १४ (महंमद राहिल २रे, १४वे, सोमण्णा बी पी ४, ४७, पुनित आर २०, ५५वे, भरत २३, ३०वले, दिक्षित २७वे, चिरंथ सोमण्णा ४२वे, लिखित बीएम ४३, ६०, कुमार यासित ५२वे, शामंत सी एस ६०) वि.वि. जम्मू-काश्मिर ० मध्यंतरा ७-०
पुड्डुचेरी – १४ (अरुण कुमार १, ३, २५, ३५वे, विरथामिझान १०वे, ४३, ५६, ५८वे मिनिट, ए. तामिलारसन १२वे, आर. रणजित १२, २२, ४२वे मिनिट, पुवीयारासन २३वे, सेलामुथु एन . ३४वे मिनिट) वि.वि. अरुणाचल प्रदेश -० मध्यंतर ८-०

गट ड –
पंजाब– ११ (लोवप्रीत जनिथ ४, ४६, ५६, ५८वे, परमजीत सिंग ६, सुदर्शन सिंग ७, १८वे, विशाल यादव २१वे, सिंग गुशहजाद पिरझादा ३०वे, गौतम कुमार ३५वे, रुपिंदर पाल सिंग ५०व मिनिट) वि.वि. उत्तराखंड ० – मध्यंतर ६-०
आंध्र प्रदेश वि. हॉकी अंदमान-निकोबार ५-०(सामना बहाल)

गट इ –
चंडिगड– १४ (मोहित ६, ४२, ५५, राजवीन सिंग, १२वे, वीर अंगद सिंग १४, २८वे, हरप्रीत सिंग १४, ३९वे, हरमनप्रीत सिंग २१वे, अमनदीप २३, २५, ५७वे, योगराज सिंगह ३५वे, जसप्रीत सिंग ३७वे मिनिट) वि.वि. राजस्थान ० – मध्यंतर ८-०
मणिपूर– २१ (मंतोष लैश्राम मैतेई २रे, ९वे, १३, १७वे, अबुंग निन्गोम्बाम सिंग ४थे, ३३वे, इबुंगो कोंजेंगबाम सिंग १०वे, रोहित केईशाम मैतेई २६, २८वे, दिनचंद्रा मोईरंगथेम सिंग ३५, ५३, ५६, ५९वे मिनिट, देबेशोर कोंजेंगबाम सिंग ३७नवे, दयानंदा चामंथाबाम ४१वे, भाकर निंन्गोबाम ४५, ४७, ४८, ५३वे, डॉलर क्षेत्रीमायुम ५१वे आणि रोमेशकुमार हेईस्नाम सिंग ६०वे मिनिट) वि.वि. त्रिपुरा ० मध्यंतर ८-०

You might also like

Comments are closed.