अमरावती(प्रतिनिधी)- महाराष्ट्र स्क्वॉश रॅकेट असोसिएशन आणि अमरावती स्क्वॉश रॅकेट असोसिएशन यांच्या संयुक्ति विद्यमानाने आयोजित १९ वर्षाखालील मुले आणि मुली , खुल्या गटात पुरुष आणि महिला स्क्वॉश राज्यस्तरीय स्पर्धा दि.१० डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहे. आज स्पर्धेचे उद्घाटन अमरावती विभागीय क्रीडा संकुल आणि बडगुजर स्पोर्ट्स अकॅडेमी येथे उद्घाटन समारंभ थाटात पार पडला . कार्यक्रमाच्या उद्घाटन आमदार रवी राणा यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले .
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिअशनचे सहसचिव तथा राज्य संघटना सचिव डॉ. दयानंद कुमार राज्य संघटना अध्यक्ष डॉ. प्रदीप खांड्रे, अमरावती क्रीडा उपसंचालक विजय संतान , प्रदीप खेडकर , चंद्रकांत उपलवार ,गणेश तांबे (संयोजक), कैलास माने आदींची उपस्थिती होती . या स्पर्धेत एकूण २६ जिल्ह्याच्या संघटनांनी सहभाग नोंदवला आहे . ही स्पर्धा वयोगट १९ वर्षाखालील मुले आणि मुली , खुल्या गटात पुरुष आणि महिला गटात आयोजित करण्यात आले आहे. आजचा निकाल खालील प्रमाणे
अंतिम फेरीत प्रवेश
पुरुष एकेरी स्पर्धेत : राहुल यादव (ठाणे) ,सचिन शिंदे (उस्मानाबाद)
महिला एकेरी: राणी गुप्ता (ठाणे), मोना चव्हाण (ठाणे) .
दुहेरी पुरुष: पुणे विरुद्ध औरंगाबाद यांच्यात उद्या अंतिम सामना होणार आहे.
या स्पर्धेत पंच म्हणून रोहित गाडेकर ,सौरभ लेकवार ,राजा यादव ,अमित सिंग ,दिपक भारद्वाज हे काम पाहत आहे .तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पवन राऊत , यज्ञेश बागराव ,रणजित भारद्वाज ,सुनील इंगोले ,गणेश मस्के ,संतोष खेडे ,विजय गाडेकर ,बाबुराव खंदारे ,महेश काळदाते ,मानव माने ,प्रमोद पारसी ,विशाल तांबे काम पाहत आहे.