नॅशनल गेम्स २०२२;स्केटिंग स्पर्धेत रिले प्रकारात महाराष्ट्राला सांघिक सुवर्णपदक

अहमदाबाद: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्केटिंगपटूंनी धमाल उडवून दिली आहे. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्र संघाने सांघिक रिले स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून शानदार गोल्डन समारोप केला.स्केटिंग स्पर्धेच्या अखेरचा दिवस महाराष्ट्र संघासाठी गोल्डन ठरला. महाराष्ट्राच्या पुरुष रिले टीमने सुवर्णपदक जिंकून पदक तालिकेत महाराष्ट्राची स्थिती अधिक भक्कम केली. विक्रम इंगळे, सिद्धांत कांबळे, सुरुद सुर्वे व आर्य जुवेकर या स्केटिंगपटूंनी रिले प्रकारात सुवर्णपदक जिंकून समारोपाचा दिवस गाजवला.

विक्रम, सिद्धांत, सुरुद, आर्यची गोल्डन कामगिरी. काल रात्री झालेल्या स्केटिंग स्पर्धेत आर्य जुवेकर याने 1000 मीटर्स प्रकारात रौप्यपदक जिंकले.

स्केटिंग संघासमवेत कोच श्रीपाद शिंदे, विजय नायडू, आशुतोष जगताप, प्रफुल्ल चंदने हे असून संघातील खेळाडूंच्या कामगिरीवर त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांनी देखील स्केटिंगपटूंचे अभिनंदन केले असून पदक तालिकेत महाराष्ट्र संघाची स्थिती भक्कम करण्यात स्केटिंगपटूंचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

You might also like

Comments are closed.