नॅशनल गेम्स २०२२: जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्र महिला संघाला कांस्यपदक

अहमदाबाद- आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी असलेल्या महाराष्ट्र महिला आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक संघाने शनिवारी 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कांस्यपदकाचा बहुमान पटकावला. महाराष्ट्र संघाने 263.60 गुण संपादन करत तिसऱ्या स्थानी धडक मारली. महाराष्ट्र संघाकडून श्रद्धा तळेकर, इशिता रेवाळे, सिद्धी हत्तेकर, मानसी देशमुख, सारिका अत्तरदे आणि सलोनी दादरकर यांनी सर्वोत्तम कामगिरी केली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला पदकाची कमाई करता आली. यासह महाराष्ट्र संघाने जिम्नॅस्टिक मध्ये पदकाचे खाते उघडले. मुख्य प्रशिक्षक प्रवीण ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाला पदकाचा बहुमान मिळाला. यादरम्यान संघ व्यवस्थापक भक्ती तिवारी यांनी सहकार्य केले.

पदकाने आत्मविश्वास द्विगुणित : कोच ढगे

महाराष्ट्र महिला संघाने आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक मध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. त्यामुळे संघ पदकाचा मानकरी ठरला. या माध्यमातून संघाला या इव्हेंटमध्ये पदकाचे खाते उघडता आले. हे पदक निश्चितपणे आमच्या संघाला उत्साहित करणारे आहे. या पदकाने खेळाडूंना प्रेरणा मिळत आहे, अशा शब्दात मुख्य प्रशिक्षक ढगे यांनी पदक विजेत्या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला.

You might also like

Comments are closed.