भारताने टी-२० मालिकेत श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला. सामना संपल्यानंतर भारताचा फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने चहल सामनावीर श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज यांची मुलाखत घेतली. यामध्ये मोहम्मद सिराजने पाहुण्याची भूमिका साकारली. यादरम्यान चहल आणि अय्यर यांनी सिराजच्या हेअरस्टाइलची खिल्ली उडवली.
चहल अय्यरशी बोलत असताना सिराजही कॅमेऱ्यासमोर आला. मग चहलने त्याच्याशी थट्टा-मस्करी केली. सिराजने नवा हेअरकट केला आहे. त्याने आपले केस पिवळ्या रंगात रंगवले आहेत. सिराजचे आगमन होताच चहल म्हणाला, सिराजचे स्वागत आहे. त्याचे केस पहा, असे दिसते की खूप काळापासून गवताला (केसांना) कोणी पाणी दिलेले नाही. गलत पूर्णपणे सुकले आहे.
चहलचे हे बोलणे ऐकून दोघेही हसायला लागले. चहलने सिराजला विचारले, प्रत्येक सामन्यापूर्वी तू हेअरकट सलूनमध्ये जातो हे खरे आहे का? यावर सिराज म्हणाला, असे काही नाही. अशा प्रकारे मी माझे केस कापतो. याला काही लॉजिक नसते.