लातूर –महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन अंतर्गत लातूर जिल्हा सोफ्टबॉल असोसिएशन द्वारा व राजर्षी शाहू महाविद्यालय (स्वयत्त) लातूर यांच्या सहकार्याने आयोजित जिह्वा क्रीडा संकुल लातूर येथे 27 वी राज्यस्तरीय महिला सॉफ्टबॉल स्पर्धेचे उदघाटन मा.ना.संजयजी बनसोडे (राज्यमंत्री,पर्यावरण, रोजगार हमी,भूकंप पुनर्वसन संसदिय कार्यमंत्री), लातूर शहराचे प्रथम नागरिक महापौर विक्रांत गोजमगुंडे सह पत्नी व शिवछत्रपती शिक्षण संस्था लातूर चे सर्वेसर्वा माजी खासदार डॉ गोपाळराव पाटील यांच्या प्रमुख उपास्थित सपन्न झाला.
या प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कारार्थी मोईज शेख(लातूर) राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव तथा शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ.प्रदीप तळवेलकर,मंजुषा गुरमे (सहायक आयुक्त),मदनलाल गायकवाड(जिल्हा क्रीडा अधिकारी लातूर)संस्थेचे सचिव अनिरुद्ध जाधवतसेच सहसचिव गोपाळ शिंदे,प्राचार्य डॉ.माधव गव्हाणे,उप प्राचार्य सदाशिव शिंदे, राज्य संघटना सदस्य सर्व जिल्हा सॉफ्टबॉल सचिव, डॉ.सुरज सिंग येवतिकर, गोकुळ तांदळे, संतोष खेंडे, संदीप लंबे,हे होते. उपस्थित होते.
तसेच स्पर्धेला सुरवात सर्व संघांचे पथसंचलन घेऊन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती.प्रीती पो्हेकर, पल्लवी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन देविदास पाटील लातूर जिल्हा सॉफ्टबॉल संघटना सचिव यांनी मानले.
आज झालेल्या सामन्यांमध्ये एवरील पिंटो (मुंबई उपनगर)मृणाल भामरे अंकिता पवार,(नवी मुंबई) सायमा बागवान, दिक्षा शिनगारे(बीड) नेहा देशमुख,सई जोशी (जळगाव)नलिनी निनोरे (अकोला) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
आज झालेल्या सामन्यासाठी पंच प्रमुख अक्षय येवले,डॉ.चेतन महाडिक,संतोष आवचार, अक्षय बिरादार,विकास वानखेडे,कल्पेश कोल्हे, अक्षय येवले, स्वप्नील गदादे,चेतन महाडिक,मुकेश बिराजदार,यांनी काम पहिले.
स्पर्धा पार पाडण्यासाठी डॉ.अनिरुद्बि बिराजदार,रत्नरानी कोळी,श्रद्धा जाधव, निशांत पिंपळे,शिवाजी पाटील, विलास जाधव,नारायण जीपरे, प्रज्वल ,रोहित खुडे,प्रेम पौळ,आशा घुले,व्यकटेश जीपरे,परिश्रम घेत आहे.
महिला सामान्यचे निकाल नक्की वाचा-
1) सांगली वि. वि मुंबई उपनगर (3-1)होमरन
2)कोल्हापूर वि.वि नवी मुंबई जिल्हा (1-0)होमरन
3) पुणे जिल्हा वि. वि अमरावती जिल्हा (10-1)होमरन
4) पुणे शहर वि.वि लातूर (1-0) होमरन
5)जळगाव मनपा वि.वि अहमदनगर (6-0)होमरन
6) अकोला वि. वि पिंपरी चिंचवड (5-1)होमरन
7)बीड वि. वि अमरावती (7-0)होमरन
8) अमरावती मनपा वि वि मुंबई उपनगर (12-0)
9) नवी मुंबई वि. वि नागपूर मनपा (7-0)