मोहाली- शुक्रवारपासून सुरू होणारी भारत-श्रीलंका यांच्यात पहिली कसोटी ही विराट कोहलीच्या कारकीर्दीतील १००वी कसोटी असून, ती प्रेक्षकांच्या साक्षीने होणार आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी मंगळवारी जाहीर केले.
भारत-श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी मोहालीतील पंजाब क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर होणार आहे. हा सामना बंदिस्त स्टेडियममध्ये होणार आहे. हा निर्णय यजमान राज्य संघटना घेते. पंजाब क्रिकेट संघटनेने प्रेक्षकांना परवानगी देता येईल, याची निश्चिती केली आहे, असे शहा यांनी सांगितले. वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिका बंदिस्त स्टेडियममध्ये खेळवण्यात आल्या होत्या.
२०१८मध्ये बुमराने कोहलीच्याच नेतृत्वाखाली कसोटी कारकीर्दीला प्रारंभ केला. आपल्या देशाचे १०० कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व करणे, हे कोणत्याही क्रिकेटपटूसाठी अभिमानास्पद आहे. यामुळे त्या खेळाडूने केलेली मेहनत तसेच संघासाठी दिलेले योगदान अधोरेखित होते. त्यामुळे कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असून, यापुढेही तो भारतासाठी मोलाची भूमिका बजावत राहील,’’ असे उपकर्णधार बुमरा म्हणाला.
कारकीर्दीतील १००वा कसोटी सामना खेळणे, ही विराट कोहलीसाठी गौरवास्पद बाब असून त्याच्यासह चाहत्यांसाठी ही लढत अविस्मरणीय करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे मत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने व्यक्त केले.