टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून निवड झाल्यानंतर 24 तास होत नाही तोच माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुढे नवी समस्या निर्माण झाली आहे.संघाचा मार्गदर्शक म्हणून त्यांची झालेली निवड समितीने घालून दिलेल्या शिफारसीनुसार हितसंबंधाचे उल्लंघन करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मध्यप्रदेश क्रिकेट संघाचे माजी सदस्य संजीव गुप्ता यांनी या मुद्द्यावर बीसीसीआयला पत्र लिहिले आहे. धोनी आयपीएल मध्ये चेन्नई संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. तर विश्वचषकात मार्गदर्शक म्हणून पडद्याच्या मागून कार्यरत असेल.त्यानुसार एक व्यक्ती एका वेळी दोन पदावर कार्यरत राहू शकत नाही असे गुप्ता यांनी पत्र स्वरूपातील तक्रारीत म्हटले आहे.बीसीसीआयला पाठवलेल्या पत्रात अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचा उल्लेख आहे. गुप्ता यांनी याअगोदरही गांगुली सहित सचिन तेंडुलकर,राहुल द्रविड,व्ही व्ही एस लक्ष्मण सहित अन्य भारतीय क्रिकेटपटूंना हीच संबंधाच्या मुद्द्यावरून लक्ष केले होते.