टी-20 विश्वचषकासाठी : बांगलादेशच्या संघ जाहीर

महम्मूदल्लाह रियादच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषकासाठी बांगलादेशचा पंधरा खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे.घरच्या मैदानात नुकतीच रंगलेल्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरोधातील मर्यादित षटकांच्या मालिकेतील संघाला कायम ठेवण्यात आले आहे. अनुभवी तमिम इक्बाल ने याअगोदरच आपल्या नावाचा विचार करू नये,असे निवड समितीला कळवले होते. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत तमीम महत्त्वाचा फलंदाज आहे. त्याच्याजागी पसंती देण्यात आलेले लिटन दास, सोम्या सरकार आणि नईम शेख यांच्यात क्षमता ठासून भरलेली आहे. आणि विश्वासास नक्कीच पात्र ठरतील असे निवड समितीचे प्रमुख मिन्हाजुल अबेदिन म्हणाले.

संघ पुढीलप्रमाणे-महम्मूदल्लाह रियाद (कर्णधार), नईम शेख, सौम्य सरकार, लिटन दास शाकिब अल हसन,मुष्फिकर रहिम,अफिफ हुसेन,नुरुल हसन, मेहदी हसन,मनुसम अहमद, मुस्तफिजुर रहमान,शरीफ उल इस्लाम,तस्किन,अहमद,मोहम्मद सैफुद्दिन,शमीम पटवारी

You might also like

Comments are closed.