मॅंचेस्टर : 10 सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे सुरू होणार होता. या अंतिम कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या मॅनेजमेंटमधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. तत्पूर्वी, प्रमुखांसह चार सपोर्ट स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याच पार्श्ववभूमीवर हा सामना स्थगित करण्यात आला आहे. दोन्ही संघाची संमती घेऊन हा सामना दोन-तीन दिवसांसाठी स्थगित केल्याचे समाजत आहे.
पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आतापर्यंत या मालिकेतील चार सामने झाले आहेत. पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला. तर, तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारत 1-1 अशी बरोबरी केली होती. मात्र चौथ्या सामन्यात फलनदाजांच्या धमाकेदार खेळीने या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.
इंग्लंडसाठी हा पाचवा सामना महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकून इंग्लंड बरोबरी साधण्याचा करणार आहे. तर भारताला पाचवा सामना जिंकून किंवा अनिर्णित राखून मालिका खिशात घालण्याची संधी आहे