गांधीनगर- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला स्क्वॉश संघाला कांस्यपदक जिंकून देण्यात महत्वाचा वाटा उचलणा-या उर्वशी जोशी हिने वैयक्तिक एकेरीत महिला गटात अंतिम फेरी गाठली आहे.महिला गटात उर्वशी जोशी हिने अंतिम फेरीत धडक मारल्यामुळे महाराष्ट्राचे एक पदक निश्चित झाले आहे.
उपांत्य फेरीत उर्वशी जोशी हिने दिल्लीच्या तन्वी खन्ना हिचा 11-2, 6-11, 11-8, 11-8 अशा फरकाने पराभव करुन अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेत उर्वशी जोशी हिने अफलातून कामगिरी बजावली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात तिच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा बाळगली जात आहे.