औरंगाबाद (प्रतिनिधी):भारतीय कुस्ती परिषदेने अजब निर्णय घेत चक्क शरद पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेस बरखास्त करण्याचा अजब निर्णय घेतला आहे. याला महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने १५ ते २३ वयोगटातील कुस्ती स्पर्धेचे आयोजन न करण्याचे कारण पुढे केले आहे गत अनेक वर्षांपासून शरद पवार हे या कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत.
या निर्णयामुळे पवार यांना हा मोठा धक्का आहे. भारतीय कुस्तीगीर परिषदेच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.भारतीय जनता पार्टीचे ब्रिजभूषण ब्रिजभूषण सिंह हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत.शरद पवार आणि ब्रिजभूषण यांच्यात निकटचे संबंध आहेत, मात्र मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार विजेते कुस्ती संघटक बाळासाहेब लांडगे यांच्या मनमानी कारभाराबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. लांडगे यांच्या विरोधात अनेक पहेवानांनीही आक्षेप नोंदविला होता.याच तक्रारीची कुस्ती परिषदेने दखल घेत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच लवकरच हंगामी समिती नेमण्यायाबाबत पाऊल उचलण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.हे तेच ब्रिजभूषण आहेत, ज्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोग्य दौरयास कडाडून विरोध केला होता.थेट शरद पवार यांची मान्यताच रद्द करणारे सिंह यांनी आपण भारतीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष असल्याने महाराष्ट्रात होणारया कुस्तीगीर सामन्याला उपस्थित होतो ,शरद पवार हे ही यावेळी उपस्थित होते,असे कारण पुढे केले आहे.
दरम्यान महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा संघटक बाळासाहेब लांडगे यांनी “स्पोर्ट्स पैनारोमाशी” सविस्तर बोलताना सिंह यांचा हा निर्णय बेकायदेशीर असून त्यांना महाराष्ट्रातील कुस्तीची ताकदच कळलेली नाही, आमची संघटना परिपक्व, येथील मल्लांचे हित जपणारी आहे, ब्रिजभूषण सिंह यांच्या डोक्यात पदोपदी महाराष्ट्र द्वेष ठायीठायी भरलेला दिसून येत आहे, शरद पवार आणि त्यांचे कुस्ती क्षेत्रातील अभूतपूर्व कार्य आणि प्रेम वादातीत आहे, पवार साहेबांनी कुस्तीसाठी सदैव मोलाची मदत आणि कामगिरी बजावली आहे, सिंह यांना कुस्ती कळलीच नाही, असे रोखठोक शब्दात सांगितले.
दरम्यान आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक आणि औरंगाबादचे नवनिर्वाचित क्रीडा अधिकारी शरद कचरे, कुस्ती संघटक प्रा. डॉ.फुलचंद सलामपुरे, एन आय एस कोच हंसराज डोंगरे, मुख्तार शेख, मंगेश बिराजदार यांनी या निर्णयाचावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.