औरंगाबाद(प्रतिनिधी): विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे सुरू असलेल्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात गुरूकुल औलिंपियाडने टाय ब्रेकमध्ये पोदार सीबीएसवर ३-० असा विजय मिळविला. आर्या कुलकर्णी हिने चमकदार कामगिरी केली.तर दुसऱ्या लढतीत पोदार आयसीएसईने वुडरीचचा १-० असा पराभव केला.
विजयी संघातर्फे अहनश्री मगर हिने एक गोल केला. १४ वर्षांखालील गटात आर.जे. इंटरनैशनल हायस्कूलने सुप्रीम ग्लोबलवर १-० तर पोदार सीबीएसने होलीकरचा ३-० असा पराभव केला, यात स्वराज सावंत, रूद्रा पाटील, रूतुराज म्हेत्रे यांनी प्रत्येकी एकेक गोल केले.
मोईन उल उलुमने मौडेद स्कूलवर ४-० असा दणदणीत विजय मिळविला.यात रेहमानने २, झिशानने १ गोल केला.विचेसटर हायस्कूलच्या अनुपस्थितीत बुम हायस्कूलला पुढे चाल देण्यात आली.
मंगळवारी मुलींच्या १४ वर्षांखालील गटात पोदार आयसीएसईने सेंट जोन्स वर १-० अशी मात करून विजयी सलामी दिली, यात श्रद्धा करजेचा गोल निर्णायक ठरला.दुसऱ्या लढतीत वुडरीजने आर.जे.इंटरनैशनलचा ३-१ असा पराभव केला, ज्यात विजयी संघातर्फे साई मुरूमकरने २, पवित्रा जाधवने १ गोल केला, तिसऱ्या लढतीत रेहान इंटरनैशनलने गुरुकुलचा २-० असा पराभव केला.विजयी संघातर्फे आर्या हिने दोन गोल केले. पोदार आय.सी.एस.ई VS गुरुकुल गुरुकुल औलिंपियाड यांच्यामध्ये अंतिम सामना दिनांक २० रोजी होणार आहे.
तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी शरद कचरे यांच्या हस्ते झाले, याआधी विभागीय क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांचे दिवंगत वडील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे,लता लोंढे, पंडित चव्हाण , संजय गाढवे, मनपा क्रीडा अधिकारी संजीव प्रसाद बालय्या आदी उपस्थित होते.
14.07.2022 रोजी होणारे सामने वेळापत्रकानुसार होतील.
वेळापत्रक खालीलप्रमाणे