तलवारबाजी खेळाडू तरुणीची आत्महत्या

औरंगाबाद(प्रतिनिधी): तलवारबाजी खेळाडू पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना पडेगाव परिसरात उघडकीस आली. अब्रोकांती शामकांत वडनेरे (वय १९) रा. दक्षता कॉलनी पडेगाव असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
अब्रोकांती नुकतीच नाशिक येथे झालेल्या तलवारबाजी स्पर्धेत सहभागी झाली होती. तिचे वडील पोलीस मुख्यालयात नोकरीला तर आई गृहिणी आहे. मोठा भाऊ उच्च शिक्षण घेत आहे. अब्रोकांती नुकतीच बारावी पास झाली होती. तिने पाथरी येथील पाथरीकर महाविद्यालयात बीसीएसच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता.

त्याचबरोबर ती तलवारबाजी खेळात भाग घेत असे. रोज ती प्रशिक्षण घ्यायलाही जायची. नाशिक येथे झालेल्या तलवारबाजी स्पर्धेत ती सहभागी झाली होती. दोन दिवसांपूर्वीच ती घरी परतली. मंगळवारी दुपारी भाऊ कॉलेजला आणि आई वडील बाहेर गेल्यानंतर तिने बेडरूम मधील फॅनच्या हुकला साडीच्या साह्याने गळफास घेतला. दुपारी आई- वडील घरी आल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. एका गुणवंत खेळाडूच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

You might also like

Comments are closed.