राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्राला ३ राैप्य, ३ कांस्यपदके

औरंगाबाद(प्रतिनिधी): भारतीय तलवारबाजी महासंघ व छत्तीसगड तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रायपूर येथे आयोजित २३ व्या सब जूनिअर राष्ट्रिय तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्र संघाने नेत्रदीपक कामगिरी करून तीन रौप्य आणि तीन कांस्यपदके प्राप्त केली आहेत. या संघाचे प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून डॉ. दिनेश वंजारे, मोहम्मद शोएब, शिल्पा नेने, सौरभ तोमर यांनी काम पाहिले.

विजेत्या संघाचे राज्याचे गृहराज्यमंत्री तथा महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष सतेज पाटील, कार्याध्यक्ष प्रकाश काटुळे, उपाध्यक्ष शेषनारायणन लोढे, अशोक दुधारे, साईचे उपसंचालक नितीन जैस्वाल, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, राज्य सचिव डॉ. उदय डोंगरे, औरंगाबाद जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष एस.पी.जवळकर, गोकुळ तांदळे, मंजूताई खंडेलवाल, डॉ.दिनेश वंजारे, तुकाराम मेहेते, स्वप्नील तांगडे, तुषार आहेर, प्रा. सागर मगरे, प्रा. संजय भूमकर आदींनी अभिनंदन केले.

विजेते संघ पुढील प्रमाणे :
इपी मुले वैयक्तिक प्रकार – साईप्रसाद जगवाड, लातूर (कांस्यपदक). मुली – प्राजक्ता पवार, रायगड (रौप्यपदक), जानव्ही जाधव, लातूर (कांस्यपदक). सांघिक प्रकार : फॉईल मुले कांस्यपदक – स्वराज डोंगरे (औरंगाबाद), वेदांत मुंडे (भंडारा),  हर्षवर्धन भांबरे (औरंगाबाद), नरेश वंजारे (औरंगाबाद). इपी प्रकार कांस्यपदक – साईप्रसाद जंगवाड (लातूर), पौरस देशमुख (बुलढाणा), अभिषेक चटप (बीड), यश टवाळ (औरंगाबाद). फॉईल मुली रौप्यपदक – कनक भोजने (औरंगाबाद), यशश्री वंजारे (औरंगाबाद), आशना चौधरी (नागपूर), अनुष्का अंकमुले (औरंगाबाद). इप्पी प्रकार रौप्यपदक – प्राजक्ता पवार (रायगड), जान्हवी जाधव (लातूर), सई भोसले (सोलापूर), वैभवी माने (लातूर).

You might also like

Comments are closed.