मुंबई । एमएसएलटीए वार्षिक मानांकन 2021 यादीत महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय टेनिसपटू ऋतुजा भोसले, आकांक्षा नित्तूरे, रुमा गाईकवारी, ऐश्वर्या जाधव यांसह अर्जुन कढे, साहेब सोधी, जैष्णव शिंदे, अर्णव पापरकर, प्रिशा शिंदे, अमोघ दामले, अधिराज दुधाने, सारा फेंगसे या खेळाडूंनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावला आहे.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या 2021ची वार्षिक मानांकन यादी जाहीर करताना एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले की, कोविडच्या दुसर्या आणि तिसर्या लाटेमुळे फार प्रमाणात टेनिसच्या स्पर्धांचे आम्हाला आयोजन करता आले नाही, तरीही जानेवारी ते डिसेंबर 2019 मध्ये कोविडच्या काळात देखील आम्ही महाराष्ट्रात 21 हून अधिक टेनिस स्पर्धांचे आयोजन करण्यात यशस्वी झालो.
2021या वर्षात एमएसएलटीएच्या वतीने 21हुन अधिक स्पर्धांचे आयोजन केले असून यामध्ये 7 आंतरराष्ट्रीय स्पर्धा(3 आयटीएफ महिला, 2 आयटीएफ ज्युनियर स्पर्धा, 2 आयटीएफ वरिष्ठ टेनिस स्पर्धा), 8 एआयटीए मानांकन स्पर्धा व 6 10 वर्षांखालील राज्य मानांकन स्पर्धांसह राज्यातील जिल्हास्तरीय व झोनल स्पर्धांचा समावेश आहे. याशिवाय मुंबईमध्ये 7 टेनिस स्पर्धांचे आयोजन केले असून यात 2 आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा, तर पुण्यात देशांतील सर्वाधिक 4 आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा आणि 1 राज्य मानांकन टेनिस स्पर्धा, कोल्हापूरमध्ये 3 टेनिस स्पर्धा,सोलापूरमध्ये 1 आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा, नवी मुंबईमध्ये 1आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा,सोलापूरमध्ये 1 टेनिस स्पर्धा, औरंगाबादमध्ये 1 टेनिस स्पर्धा आणि नाशिकमध्ये 1 टेनिस स्पर्धांचा समावेश आहे.
सुंदर अय्यर पुढे म्हणाले की, राज्यातील आपल्या खेळाडूंसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील दर्जाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यामुळे या खेळाडूंना आपले मानांकन सुधारण्यास मदत होत आहे.2021च्या वार्षिक मानांकन यादीत राज्यातील चार मुलींनी देशातील विविध गटात अव्वल 5 खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे.
तसेच, 2021 मध्ये राज्यातील खेळाडूंमध्ये पुण्यातील नऊ खेळाडूंनी अव्वल स्थान पटकावले असून यामध्ये अर्जुन कढे(पुरुष गट), ऋतुजा भोसले(महिला गट), रुमा गाईकवारी(16वर्षाखालील मुली), अर्णव पापरकर(14वर्षांखालील मुले), प्रिशा शिंदे(12वर्षाखालील मुली),अमोघ दामले(12वर्षांखालील मुले),अधिराज दुधाने(10वर्षांखालील मुले) आणि सारा फेंगसे(10वर्षांखालील मुली) यांचा समावेश आहे.
मुंबईच्या साहेब सोधी(18वर्षांखालील मुले), नाशिकच्या जैष्णव शिंदे(16वर्षांखालील मुले), नवी मुंबईच्या आकांक्षा नित्तूरे(18वर्षांखालील मुली) आणि कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधव(14 वर्षांखालील मुली) या खेळाडूंनी अव्वल क्रमांक पटकावला आहे.
विविध वयोगटानुसार अव्वल 8 खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे
10वर्षांखालील मुले: 1. अधिराज दुधाने(पुणे), 2.आरव बेले(पुणे), 3. वेदांग गायकवाड(सांगली), 3.वीर चत्तुर(पुणे), 4.पार्थ दभीकर(पुणे), 5.युगंधर शास्त्री(पुणे), 6.स्मित उंडरे(पुणे), 7. कबीर गुंडेचा(पुणे), 8.विराज सेठ (पुणे);
10 वर्षांखालील मुली: 1. सारा फेंगसे(पुणे), 2. सृष्टी सूर्यवंशी(पुणे), 2. श्रावि देवरे(पुणे), मोहक कुलकर्णी(मुंबई), 3.हर्षा देशपांडे(पुणे), 4.अनिका नायर(पुणे), रुपल आंदेकर (पुणे);
12वर्षांखालील मुले: 1.अमोघ दामले(पुणे), 2.ओम वर्मा(मुंबई), 3.द्रोण सुरेश(मुंबई), 4.आयुश पुजारी(मुंबई), 5.शिवतेज शिरफ़ुले(नांदेड), 6. आर्यन शेट्टी(मुंबई), 7.शौर्य घोडके(पुणे), 8.श्लोक चौहान(मुंबई);
12वर्षांखालील मुली: 1.प्रिशा शिंदे(पुणे), 2.पार्थसारथी मुंढे(सोलापूर), 3. मेह्क कपूर(पुणे), 4.व्रण्डिका राजपूत(औरंगाबाद), 5.मृणाल शेळके(मुंबई), 6.रिद्धी शिंदे(मुंबई), 7.रितिका कापले(पुणे), 8. अनुशा मेहता(मुंबई);
14 वर्षांखालील मुले: 1.अर्णव पापरकर(पुणे), 2.समर्थ संहिता(मुंबई), 3.वेदांत भसीन(मुंबई), 4.मानस धामणे(पुणे), 5.प्रद्युम्न सिंग तोमर( नवी मुंबई), 6.दक्ष कुकरेती(नवी मुंबई), 7.नील जोगळेकर(पुणे), 8.अभिराम निलाखे(पुणे);
14वर्षांखालील मुली: 1.ऐश्वर्या जाधव(कोल्हापूर), 2. आस्मि आडकर(पुणे), 3.नैनिका रेड्डी बेंदराम(सोलापूर), 4.आकृती सोनकुसरे(सोलापूर), 5.सेजल भुतडा(नागपूर),6.देवांशी प्रभुदेसाई(पुणे), 7.आनंदी भुतडा(नवी मुंबई), 8.प्रिशा शिंदे(पुणे);
16वर्षांखालील मुले: 1.जैष्णव शिंदे(नाशिक),2.मानस धामणे(पुणे), 3. तनिष्क जाधव(पुणे), 4.ओमर सुमर(मुंबई), 5.अझमीर शेख(नवी मुंबई), 6.प्रज्वल तिवारी(मुंबई),7. प्रणव कोरडे(औरंगाबाद), 8.अर्जुन अभ्यंकर(पुणे);
16वर्षांखालील मुली: 1.रुमा गाईकवारी(पुणे), 2.मधुरिमा सावंत(पुणे), 3.सोनल पाटील(कोल्हापूर), 4.ऐश्वर्या जाधव(कोल्हापूर), 5.ख़ुशी शर्मा(पुणे), 6.आन्या जेकब(पुणे), 7.जिया परेरा(मुंबई), 8. कायरा चेतनानी(मुंबई);
18वर्षांखालील मुले: 1.साहेब सोदी(मुंबई), 2.संदेश कुरळे(कोल्हापूर), 3.दक्ष अगरवाल(पुणे), 4.अनर्घ गांगुली(पुणे), 5.शिवम कदम(मुंबई), 6.मानस धामणे(पुणे), 7.प्रसाद इंगळे(पुणे), 8.अनुप बंगार्गी(नवी मुंबई) ;
18 वर्षांखालील मुली: 1.आकांक्षा नित्तूरे(नवी मुंबई), 2.रुमा गाईकवारी(पुणे), 3.वैष्णवी आडकर(पुणे), 4.मधुरिमा सावंत(पुणे), 5.सुदिप्ता सेंथिल कुमार(मुंबई), 6.राधिका महाजन(पुणे), 7.सोनल पाटील(कोल्हापूर), 8.सई भोयर(नागपूर);
पुरुष: 1. अर्जुन कढे(पुणे), 2.आर्यन गोवीस(मुंबई);
महिला: 1.ऋतुजा भोसले(पुणे), 2.मेहक जैन(नवी मुंबई).