राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी ): नुकत्याच पार पडलेल्या गोपालन स्पोर्ट्स सेंटर, बेंगळूरू, कर्नाटक येथे १७व्या राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे आयोजन जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि कर्नाटक जिम्नॅस्टिक्स फेडरेशन यांच्याद्वारे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने ५ सुवर्ण १० रौप्य व ३ कांस्यपदकांची कमाई केली.

सूर्या सौंदळे, सृष्टी खोडके, अद्वैत वझे यांनी वैयक्तिक स्पर्धेमध्ये संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. ज्युनिअर वयोगटात ग्रुप कॅटेगिरी मध्ये अद्वैत वझे, देवेश कातनेश्र्वरकर, दीपक अर्जुन, पाणिनी देव, रामदेव बिराजदार, तसेच धैर्यशील देशमुख, संदेश चिंतलवाड, साक्षी लड्डा, साक्षी डोंगरे, विजय इंगळे, सायली वझरकर, अभय उंटवाल यांनी वरिष्ठ गटामध्ये एरोडान्स प्रकारात संघाला सुवर्ण पदक मिळवून दिले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने आपला दबदबा कायम ठेवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत डॉ. मकरंद जोशी यांनी तांत्रिक समिती अध्यक्ष म्हणून काम पाहिले. अमेय जोशी, विवेक देशपांडे, डॉ. निलेश जोशी आणि संदीप लटपटे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

या संघाबरोबर हर्षल मोगरे, हर्षद कुलकर्णी, मनीष थट्टेकर, आशा झुंजे हे प्रशिक्षक म्हणून व राहुल पहुरकर, प्रदीप लटपटे यांनी संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. स्पर्धेमधील सर्व पदक विजेत्या खेळाडूंना महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष  संजय शेटे, उपाध्यक्ष डॉ. आदित्य जोशी,सचिव डॉ.मकरंद जोशी भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभाग उपसंचालक श्री. नितीन जैस्वाल, क्रीडा व युवक सेवा संचलनालय छत्रपती संभाजीनगर विभाग उपसंचालक  सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी  बाजीराव देसाई, मसांमचे अध्यक्ष राम पातूरकर, सचिव हेमंत पातूरकर, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष अॅड. संकर्षण जोशी, उपाध्यक्ष डॉ. रणजीत पवार,कोषाध्यक्ष डॉ. सागर कुलकर्णी, डॉ. विशाल देशपांडे, संदीप गायकवाड, राहुल तांदळे, रोहित रोंघे, डॉ.राहुल श्रीरामवार, भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभाग जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक संजय मोरे, राज्य शासन क्रीडा मार्गदर्शक सौ. तनुजा गाढवे यांनी या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.

पदक विजेत्या खेळाडूंची नावे खालील प्रमाणे:

वरिष्ठ गट
साक्षी डोंगरे (महिला एकेरी – कास्य)
साक्षी लड्डा व धैर्यशील देशमुख (मिश्र दुहेरी – रौप्य)
संदेश चिंतलवाड, आर्य शहा व स्मित शहा (मिश्र तिहेरी – रौप्य)
गौरव जोगदंड, विजय इंगळे, प्रेम बनकर, उदय मधेकर व अभय उंटवाल (ग्रुप – रौप्य)
धैर्यशील देशमुख, साक्षी लड्डा, साक्षी डोंगरे, संदेश चिंतलवाड, सायली वझरकर, विजय इंगळे, उदय मधेकर व अभय उंटवल (एरोडान्स – सुवर्ण)

कनिष्ठ गट
अद्वैत वझे (पुरुष एकेरी – सुवर्ण)
गौरी ब्राह्मणे व अनिकेत चौधरी (मिश्र दुहेरी – रौप्य)
राधा सोनी, विश्वेश पाठक व अनिकेत चौधरी (मिश्र तिहेरी – रौप्य)
देवेश कातनेश्वकर, अद्वैत वझे, दिपक अर्जुन, पाणिनी देव व रामदेव बिराजदार (ग्रुप – सुवर्ण)

१२ ते १४ वर्ष वयोगट
रिया नाफडे (महिला एकेरी – रौप्य)
आर्यन फुले व पुष्टी अजमेरा (मिश्र दुहेरी – रौप्य)
गीत भालसिंग, सनवी सौंदळे व सिद्धी उपरे (मिश्र तिहेरी – रौप्य)
चिरंजीता भवलकर, अनुश्री गायकवाड, गीत भालसिंग, सनवी सौंदळे व रिया नाफडे (ग्रुप-रौप्य)

नॅशनल डेव्हलमेंट
सूर्या सौंदळे (पुरुष एकेरी – सुवर्ण)
सृष्टी खोडके (महिला एकेरी – सुवर्ण)
अक्षया कलंत्री व अद्वैत काचेकर (मिश्र दुहेरी – रौप्य)
अद्वैत काचेकर, अवंतिका सानप व श्वेता राऊत (मिश्र तिहेरी – रौप्य. एकूण ५ सुवर्ण, ११ रौप्य व १कास्य..

You might also like

Comments are closed.