महाराष्ट्र राष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरीत.
तामिळनाडू येथे सुरू असलेल्या फुटसल राष्ट्रीय स्पर्धेत शानदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. महाराष्ट्राने उपांत्य फेरीत पौंडीचेरी चा रोमांचक सामन्यात 3-2 अशा फरकाने पराभव केला.
आता महाराष्ट्राचा अंतिम फेरीत दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्यां सोबत होणार आहे. दोन्ही संघाकडून चांगल्या खेळांचे प्रदर्शन करण्यात आले. सामना बरोबरीत चालत होता, पण निर्णय क्षणी महाराष्ट्राने तिसरा गोल करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
महाराष्ट्र संघाकडून देवेंद्र ने दोन तर आदित्यने एक गोल केला आहे. दोन गोल करणारा देवेंद्र उपांत्यफेरीत सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.तसेच महाराष्ट्रकडून जालन्याचा गोलकीपर ऋत्विक बगाडिया याने शानदार बचाव करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले अर्णव शिंदे नेही चांगला प्रदर्शन केला.
महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यात जालन्याचे प्रशिक्षक आमिर यार खान यांनी मोलाचे योगदान दिले आहे. अमीर यार खान हे जालन्यात युथ फुटबॉल अकॅडमी चालवतात, तसेच जालन्याच्या फुटबॉल विकासात ते महत्वपूर्ण योगदान देत आहे.