दुबई– आयपीएल नॉकआउट सामन्याला सुरुवात झाली आहे. आज एलिमिनेटर मध्ये बेंगलोर समोर कोलकाता चे आवाहन असणार आहे. तर यामध्ये बेंगलोर ने नाणेफेक जिंकून नेहमीपृमाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघाने आपल्या संघात एकही बदल केलेला नाही.. आज जिंकणारा संघ दिल्ली शी क्वालिफायर 2 मध्ये भीडणार आहे, तर हरणारा संघ स्पर्धेतून बाहेर होणार आहे. दोन्ही संघात टी-20 चे मातब्बर खेळाडू असल्यामुळे एक रोमांचक नौक आऊट सामना दर्शकांना पाहावयास मिळणार आहे.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे-
कलकत्ता-व्यंकटेश अय्यर, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, ओएन मॉर्गन, दिनेश कार्तिक, शाकिब अल हसन, सुनील नारायण,लॉकी फर्ग्युसन, शिवम मावी,वरून चक्रवती
बेंगलोर-विराट कोहली,देवदत्त पदिक्कल,के एस भरत,एबी डिव्हिलियर्स,ग्लेन मॅक्सवेल,ख्रिश्चन शहाबाज अहमद,जॉर्ज गारटनन,युजवेंद्र चहल,मोहम्मद सिराज,हर्षल पटेल.