जालना(प्रतिनिधी)-जालना क्रिकेट असोसिएशन व साई काणे क्रिकेट अकॅडमीच्या स्टार खेळाडू माधुरी आघाव व मीना गुर्वे यांची बीसीसीआयच्या एकदिवसीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघात निवड झाली आहे.
डेहराडून,उत्तराखंड येथे होणाऱ्या एकदिवसीय स्पर्धेत त्या महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करेल.
साई काणे क्रिकेट अकॅडमी जालनाचे संचालक, प्रशिक्षक तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे निवड समिती सदस्य राजु काणे यांच्या मार्गदर्शनाखाली माधुरी व मीना या महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या तब्बल २८ साव्या खेळाडू ठरल्या आहेत.
जिल्हा क्रिकेट असोसिएशनचेचे अध्यक्ष अॅड. नरेंद्र देशपांडे, उपाध्यक्ष दिलीप शाह, सहसचिव अभिजित चव्हाण, कार्याध्यक्ष संजय राख आदींचे सहकार्य लाभले.तसेच या निवडीबद्दल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खा. रावसाहेबजी दानवे,राज्य आरोग्य मंत्री राजेश भैय्या टोपे ,आमदार कैलास गोरंट्याल, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर आदिने निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.