जालना(प्रतिनिधी)-काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटयाल आणि नगराध्यक्षा संगीताताई गोरंटयाल यांचे सुपुत्र युवा नेते अक्षय गोरंटयाल यांनी एका उदघाटन समारंभात बॉक्सिंग आणि मार्शल आर्टची प्रात्याक्षिकेच करून दाखविल्याने उपस्थितांना राजकारणपलीकडचा त्यांचा एक नवीन रूप पाहायला मिळालं.
जालना जिल्हा पिंच्याक सिलेट असोसिएशन अंतर्गत शहरातील टेलिकॉम कॉलनी येथे नोव्हा पिंच्याक सिलेट अकॅडमीचं काल त्यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आलं. लहानपणी मी पण बॉक्सिंग आणि मार्शल आर्टचा खेळाडू होतो. तुम्ही नशीबवान आहात तुम्हाला अकॅडमीमध्ये सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत आम्ही तर इमारतीच्या गच्चीवर प्रशिक्षण घ्यायचो,असे म्हणत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. पिंच्याक सिलेट सेल्फ डिफेन्सचा उत्कृष्ट प्रकार असून यामध्यमातून सर्वांनी स्वरक्षणासाठी आत्मनिर्भर व्हावे,असं आवाहन ही त्यांनी यावेळी केलं.
यावेळी अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी सादर केलेली मार्शल आर्टची प्रात्यक्षिके पाहून अक्षय गोरंटयाल अतिउत्साही झाले आणि त्यांनी देखील बॉक्सिंग आणि मार्शल आर्टची प्रात्यक्षिके करून दाखविल्याने उपस्थितांना राजकारणपलीकडचा त्यांचा एक नवीन रूप पाहायला मिळालं.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त न्यायाधीश मनोहर आगलावे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंच्याक सिलेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.डॉ. प्रवीण चंदनशिवे, उपाध्यक्ष दिनेश भगत, तायक्वांदो असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, राष्ट्रीय खेळाडू तथा पंच सचिन आर्य, हिंदू महासभेचे नेते धनसिंह सूर्यवंशी, माजी नगरसेवक नरेश खुदभैय्ये, आकाश गायकवाड आदिंची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचं प्रास्ताविक पिंच्याक सिलेट असोसिएशनचे सचिव व मुख्य प्रशिक्षक प्रतीक ढाकणे यांनी केलं तर सूत्रसंचालन सहसचिव प्रा. विजय कमळे पाटील यांनी केलं.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिंच्याक सिलेट असोसिएशनचे किशोर ढाकणे, गणेश सुरंगे, चेतन शेटे, कृष्णा बोर्डे, देवराज कामड आदींनी परिश्रम घेतले.