आयपीएल मध्ये आज मुंबई इंडियन्स समोर कोलकाता नाईट रायडर्स चे आव्हान आहे. यामध्ये कोलकाता ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई संघासाठी एक आनंदाची बातमी आहे कर्णधार रोहित शर्मा या सामन्यासाठी उपलब्ध आहे . तो अनमोल प्रीत सिंग च्या जागी संघात आला आहे. तर दुसरीकडे कोलकाता ने आपल्या संघात कोणताच बदल केलेला नाही. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मुंबईने चार षटकात 29 धावा केल्या होत्या. त्यात रोहित शर्माने नाबाद 21 धावा केल्या तर यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक सहा धावा करून नाबाद आहे. या सामन्यामध्ये रोहित शर्मा ने केकेआर विरुद्ध आपले एक हजार धावा पूर्ण केले. आयपीएल मध्ये एका संघाविरुद्ध हजार धावा ठोकणारा तो पहिलाच खेळाडू ठरलाय.
संघ पुढीलप्रमाणे-
कोलकाता– शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, एओन मॉर्गन, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, सुनील नारायण, लॉकी फर्ग्युसन, वरून चक्रवती, प्रसिद्ध कृष्णा
मुंबई-रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, कायरन पोलार्ड, सौरभ तिवारी, कृणाल पांड्या, एडम मिलने, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेन बोल्ट