औरंगाबाद-कॉर्फबॉल फेडरेशन ऑफ इंडिया व हिमाचलप्रदेश कॉर्फबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, 19व्या फेडरेशन कप राष्ट्रीय कॉर्फबॉल अजिंक्यपद वरिष्ठ गटांच्या स्पर्धेचे आयोजन येत्या दिनांक 1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर ते २०२१ तारखेदरम्यान कुलु, हिमाचालप्रदेश, येथे करण्यात आले आहे.
कर्फबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने 19व्या फेडरेशन कप राष्ट्रीय कॉर्फबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन नवीन पद्धतीने व खेलो इंडिया स्पर्धेच्या धर्तीवर देशातील अव्वल आठ राज्याच्या कॉर्फबॉल संघांची निवड करून त्यांच्यामध्ये साखळी व नंतर बाद पद्धतीने स्पर्धा खेळविली जाणार आहे व ती सर्व खेळाडूंना पर्वणीच ठरणार आहे.
त्या अनुषंगाने 19व्या फेडरेशन कप राष्ट्रीय कॉर्फबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या सहभागासाठी महाराष्ट्राच्या राज्याच्या संघाची पी. सी. महाविद्यालय, बारामती, येथे महाराष्ट्र राज्य कॉर्फबॉल संघटनेचे सचिव श्री प्रवीण मानवतकर यांनी घोषणा केली, त्यात औरंगाबाद जिल्ह्याचा आंतरराष्ट्रीय खेळाडू विपुल कड, राष्ट्रीय कॉर्फबॉल खेळाडू सिद्धी सेठी, भूमी कपूर व गौरी पाटील यांची संघात निवड करण्यात आली असून राज्याच्या संघासोबत चौघेही पुणेमार्गे कुलु, हिमाचलप्रदेश, येथे स्पर्धेच्या सहभागासाठी २8 सप्टेंबर 2021 रोजी संघासोबत रवाना होत आहेत.
आंतरराष्ट्रीय खेळाडू विपुल कड, राष्ट्रीय कॉर्फबॉल खेळाडू सिद्धी सेठी, भूमी कपूर व गौरी पाटील हे एम.एस.एम. बास्केटबॉल स्पोर्ट्स असोसिएशनचे राष्ट्रीय खेळाडू असून त्यांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक गणेश कड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.खेळाडू असून मागील राष्ट्रीय स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याच्या संघाने दुसरे स्थान पटकावले होते व यावेळी देखील राज्याला चौघांकडून खूप अपेक्षा आहेत.
आंतरराष्ट्रीय खेळाडू विपुल कड, राष्ट्रीय कॉर्फबॉल खेळाडू सिद्धी सेठी, भूमी कपूर व गौरी पाटील यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र कॉर्फबॉल असोसिएशनचे सचिव प्रवीण मानवतकर, संघ निवड समितीचे अध्यक्ष अतूल खोमणे, अशोक देवकर, प्रशिक्षक डॉ. गौतम जाधव, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे सचिव श्री हेमंत पातुरकर, जिल्हा कॉर्फबॉल संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब मोहिते, सचिव गणेश कड, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त डॉ उदय डोंगरे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. मकरंद जोशी, प्राचार्या शशिकला निलवंत, सय्यद रफिक, ज्योती दांडगे, मंदा कड, प्रशांत बुरांडे, विश्वास कड, सचिन तत्तापुरे आदींनी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र राज्याचा संघ पुढील प्रमाणे,
मुले, विपूल कड, श्रेयस शेवते, दिशान गांधी, प्रणव खोमणे, श्रीप्रसाद पांढरे, संदेश पवार, रुणाल मालुसरे, तुषार वाळुंजे
मुली, कर्णधार पूजा पांढरे, सिद्धी सेठी, भूमी कपूर, गौरी पाटील, निशा पांडिया, शरयू जगताप, दृष्टी चव्हाण, दीप्ती पखाले