आयपीएल मध्ये कोलकाता नाईट रायडर्स समोर मुंबई होते. यामध्ये गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर तसेच राहुल त्रिपाठी व व्यंकटेश अय्यर तुफानी खेळीच्या बळावर कोलकाता ने मुंबईला एकतर्फी सामन्यात हरविले आहेत. राहुल त्रिपाठी या सामन्यात सामनावीर ठरला. त्याने मात्र 42 चेंडूत 8 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 74 धावा केल्या. या सामन्यांमध्ये मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मा ची वापसी झाली. रोहित शर्माने या सामन्यात केकेआर विरुद्ध आपले एक हजार धावा पूर्ण केल्या. आयपीएल मध्ये एका संघाविरुद्ध एक हजार धावा पूर्ण करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.
नाणेफेक जिंकून कोलकाता नाइट रायडर ने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांना हा निर्णय महाग ठरला.मुंबई इंडियन्स सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. कर्णधार रोहित शर्मा व क्विंटन डी कॉक ने पहिल्या विकेट साठी 78 धावांची भागीदारी केली. असे वाटत होते की मुंबई मोठा स्कोर उभारणार, मात्र नंतर कोणताही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. यामुळे त्यांना 155 धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबईकडून डी कोकणे 55 तर रोहित शर्माने 33 धावांचे योगदान दिले. तर केकेआर करून कृष्णा व फर्ग्युसन या प्रत्येकी दोन व नारायणे एक गडी बाद केला. धावांचा पाठलाग करीत असताना कोलकाता ची ही सुरुवात चांगली झाली नाही. शुभमन गिल हा लवकरच तंबूत परतला. मात्र त्यानंतर सलामीवीर व्यंकटेश अय्यर व राहुल त्रिपाठी ने चांगली भागीदारी करून संघाचा विजय निश्चित केलं. व्यंकटेश अय्यर 53 धावा करून बाद झाला तर राहुल त्रिपाठी ने सर्वाधिक 74 धावांचे योगदान दिले. तर मुंबईकडून बूमराहणे सर्वाधिक तीन गडी बाद केले. या विजयामुळे कोलकाता ने पॉईंट्स टेबल मध्ये चौथ्या स्थानावर मुसंडी मारली आहे. तर मुंबईची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. उद्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई समोर विराट कोहलीच्या बेंगलोर चे आवाहन असणार आहे. दर्शकांना एक रंगतदार सामना पहावयास मिळणार आहे