IPL2022: गुजरात टायटन्स 5 विकेट्सनी जिंकला;राहुल तेवतियाची अर्धशतकी खेळी

जगभरात लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा चौथा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात झाला. अकेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने ५ विकेट्सने विजय मिळवला. विशेष म्हणजे, लखनऊ आणि गुजरात हे दोन्ही संघ आयपीएलच्या १५व्या हंगामात नव्याने सामील झालेले संघ आहेत. आता हा सामना जिंकत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने विजयी सुरुवात केली आहे.

नाणेफेक जिंकत गुजरात टायटन्सने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. तसेच, लखनऊ सुपर जायंट्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी लखनऊने निर्धारित २० षटकांमध्ये ६ विकेट्स गमावत १५८ धावा

गुजरातचा डाव

डावखुरा फलंदाज मॅथ्यू वेड आणि शुबमन गिल यांनी गुजरातच्या डावाची सुरुवात केली. लखनऊच्या दुष्मंथा चमीराने शुबमनला खातेही खोलू दिले नाही. त्यानंतर चमीराच्या भन्नाट यॉर्करवर विजय शंकर माघारी परतला. कप्तान हार्दिक पंड्याने डाव सावरला. त्याने ५ चौकार आणि एका षटकारासह ३३ धावा केल्या. कृणाल पंड्याने हार्दिकला झेलबाद केले. त्यानंतर डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया यांनी अर्धशतकी भागीदारी रचली आणि संघाला विजयासमीप आणले. मिलरने ३० धावा केल्या, तर तेवतिया २४ चेंडूच ५ चौकार आणि २ षटकारांसह ४० धावांवर नाबाद राहिला.केल्या होत्या. लखनऊकडून मिळालेले १५९ धावांचे आव्हान गुजरातने १९.४ षटकात ५ विकेट्स गमावत पार केले.

लखनऊचा डाव

गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने लखनऊला चांगली सुरुवात करू दिली नाही. त्याने कप्तान केएल राहुलला पहिल्याच चेंडूवर यष्टीपाठी झेलबाद केले. त्यानंतर शमीने क्विंटन डी कॉकचा (७) सुरेख त्रिफळा उडवला. यानंतर आलेल्या एविन लुईसचा शुबमन गिलने अप्रतिम झेल टिपला. २९ धावांत ४ फलंदाज बाद झाल्यानंतर दीपक हुडा आणि आयुष बदोनीने डाव सावरला या दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला शतकापार पोहोचवले. हुडाने ६ चौकार आणि २ षटकारांसह ५५ धावांची खेळी केली. राशिद खानने त्याला पायचीत पकडले. त्यानंतर कृणाल पंड्याने बदोनीसोबत धावा केल्या. १९व्या षटकात बदोनीने लॉकी फर्ग्युसनला षटकार खेचत आपले अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या षटकात तो झेलबाद झाला. बदोनीने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५४ धावा केल्या. २० षटकात लखनऊने ६ बाद १५८ धावा केल्या कृणाल २१ धावांवर नाबाद राहिला. गुजरातकडून शमीने ३ तर वरूण आरोनने २ बळी टिपले.

You might also like

Comments are closed.