IPL 2022 : चेन्नई आणि कोलकाता संघांमध्ये रंगणार उद्घाटन सामना, अशी असेल संभाव्य प्लेइंग इलेव्हन

इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामाचा पहिला सामना चार वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि दोन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. शनिवारी (२६ मार्च) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघांचा हा उद्घाटनाचा सामना पार पडणार आहे. चेन्नईचे कर्णधारपद प्रथमच रवींद्र जडेजाच्या हाती आणि कोलकाताचे कर्णधारपद पहिल्यांदाच श्रेयस अय्यरच्या (Shreayas iyer) हाती असणार आहे. दोन्ही नवीन कर्णधारांसमोर पहिल्या सामन्यासाठी योग्य प्लेइंग इलेवन निवडण्याचे आव्हान असणार आहे.

चेन्नईला मोईन अली, दीपक चहर आणि ड्वेन प्रिटोरियस यांची सेवा मिळणार नाही. कोलकाता संघ त्यांच्या दोन ऑस्ट्रेलियन दिग्गज अॅरॉन फिंच आणि पॅट कमिन्सशिवाय सुरुवातीच्या सामन्यात खेळणाार आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत २६ सामने झाले आहेत. यापैकी चेन्नईने १७ सांमने जिंकले आहेत. त्याचबरोबर कोलकाताला अवघ्या सात सामन्यांत यश मिळाले आहे. एका सामन्यात निकाल लागला नाही.

चेन्नई फलंदाजी फळी- मोईन अलीच्या अनुपस्थितीमुळे रॉबिन उथप्पा तिसऱ्या आणि अंबाती रायुडू चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. ऋतुराज गायकवाडसह न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे डावाची सुरुवात करू शकतो. कर्णधार जडेजा पाचव्या, शिवम दुबे सहाव्या आणि धोनी सातव्या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे. ड्वेन ब्राव्हो आठव्या क्रमांकावर उतरू शकतो.

चेन्नई गोलंदाजी फळी – दीपक चहरच्या अनुपस्थितीत चेन्नईला गोलंदाजीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वेगवान गोलंदाज अॅडम मिलने आणि ख्रिस जॉर्डन खेळण्याची शक्यता आहे. मुंबईच्या युवा प्रशांत सोलंकीला फिरकी गोलंदाजी विभागात संधी मिळू शकते. जडेजा, शिवम दूबे आणि ड्वेन ब्राव्होही गोलंदाजीत चमत्कार करू शकतात.

कोलकाता फलंदाजी फळी- या हंगामात शुभमन गिल आणि राहुल चहर संघासोबत नाहीत. अॅरॉन फिंचही किमान पहिल्या पाच सामन्यांमध्ये खेळणार नाही. व्यंकटेश अय्यरसह अजिंक्य रहाणे डावाची सुरुवात करू शकतो. श्रेयस अय्यर तिसऱ्या, नितीश राणा चौथ्या आणि सॅम बिलिंग्स पाचव्या क्रमांकावर उतरू शकतात. त्याच्यानंतर आंद्रे रसेल आणि सुनील नरेन फिनिशरच्या भूमिकेत दिसणार आहेत.

कोलकाता गोलंदाजी फळी- पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीमुळे टीम साऊदी गोलंदाजीची धुरा सांभाळेल. शेवटच्या हंगामात त्याने संघासाठी चांगली कामगिरी केली होती. शिवम मावी आणि उमेश यादव हे अन्य वेगवान गोलंदाज असतील. नरेनसह वरुण चक्रवर्ती फिरकी विभाग सांभाळतील.

चेन्नई सुपर किंग्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा (कर्णधार), शिवम दुबे, महेंद्रसिंग धोनी (विकेटकीपर), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, अॅडम मिलने आणि प्रशांत सोलंकी.

कोलकाता नाईट रायडर्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्ज, आंद्रे रसेल, सुनील नारायन, टीम साऊदी, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, उमेश यादव.

महत्त्वाच्या बातम्या-

मंत्री महोदय सुनील केदार साहेब औरंगाबादच्या क्रीडाधिकारी कविता नावंदेवर कारवाई कधी?

महाराष्ट्राच्या अविनाश साबळेचा भीमपराक्रम; मोडला स्वत:चाच ऑलिम्पिक रेकॉर्ड!

दोन फ्रँचायझी वाढल्या तरीही ‘हाच’ संघ सर्वांचा बाप,यंदाही पटकावणार आयपीएल ट्रॉफी!

 

You might also like

Comments are closed.