औरंगाबाद(प्रतिनिधी): गुमरेज, पोर्तुगाल येथे दि. 14 ते 19जून 2022 दरम्यान होत असलेल्या 17 व्या जागतिक एरोबिक जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाचे सराव शिबिर औरंगाबाद येथील पश्चिम विभागीय साई प्रशिक्षण केंद्रात दिनांक 1 जून 2022 ते 11 जून 2022 दरम्यान संपन्न झाले. या प्रशिक्षण शिबिरात 17 खेळाडू सहभागी झाले होते. या प्रशिक्षण शिवराची (दि.११) शनिवार रोजी साई पश्चिम विभागीय केंद्र औरंगाबाद येथे सांगता झाली.
सेनादलाचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुनील छत्री महाराष्ट्राचे हर्षल मोगरे व एशियन जिम्नॅस्टिक्स युनियन चे तांत्रिक समिती सदस्य डॉक्टर मकरंद जोशी आणि सिद्धार्थ कदम यांनी या शिबिरात खेळाडूंना मार्गदर्शन केले. अतिशय कसून सराव खेळाडूंकडून या शिबिरात करून घेण्यात आला व खेळाडूंच्या सफाईदार कामगिरीवर जास्त भर देण्यात आला. भारतीय संघातील खेळाडू निश्चितच अंतिम फेरीपर्यंत पोहोचतील अशी आशा प्रशिक्षकांनी व्यक्त केली आहे. भारतीय संघ 13 जून सोमवार रोजी सायंकाळी दिल्लीमार्गे पोर्तुगालला रवाना होणार आहे.
भारतीय संघ पुढीलप्रमाणे
पुरुष एकेरी जॉनी कुमार ( सेनादल) महिला एकेरी अरीहा पंगंबम (मणिपूर) मिश्र दुहेरी ऋग्वेद जोशी – साक्षी लड्डा (महाराष्ट्र) मिश्र दुहेरी -2 प्रकृती शिंदे – निशांत चौहान (गुजरात) तिहेरी जॉनी कुमार, मोहम्मद नयमुद्दीन, संदीप रमोला (सेनादल) समूह धैर्यशील देशमुख, संदेश चींतलवाड, गौरव जोगदंड, अभय उंटवाल, ऋग्वेद जोशी (महाराष्ट्र) एरोडान्स :- साक्षी लड्डा, सिल्वी शहा, साक्षी डोंगरे, विजय इंगळे, धैर्यशील देशमुख, संदेश चींतलवाड, गौरव जोगदंड, अभय उंटवाल (महाराष्ट्र) प्रशिक्षक:- सुनील छत्री (सेनादल) हर्षल मोगरे (महाराष्ट्र) पंच:- यूमनाम रंजन (मणिपूर) व्यवस्थापक:-टी.पी. किरण (कर्नाटक) संघ प्रमुख:- दिलीप सर्वैया (गुजरात)
या संघाला भारतीय जिम्नॅस्टिक्स महासंघाचे अध्यक्ष सुधीर मित्तल, कोषाध्यक्ष कौशिक बीडवाला, तांत्रिक समिती अध्यक्ष एस पी सिंग महाराष्ट्र जिमनॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे सचिव डॉ. मकरंद जोशी औरंगाबाद जिल्हा जिम्नास्टिक्स संघटनेचे अध्यक्ष डॉ. आदित्य जोशी, संकर्षण जोशी, सागर कुलकर्णी, तनुजा गाढवे, साई पश्चिम विभागीय केंद्राचे संचालक सुस्मिता जुत्शी, उपसंचालक श्रीनिवास मालेकर, प्रशिक्षक संजय मोरे, पिंकी देवनाथ, औरंगाबाद विभागाचे क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.