सोलापूर (प्रतिनिधी): जिल्हा टेनिस संघटना(एसडीएलटीए)यांच्या वतीने आयोजित व एआयटीए, एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सोलापूर ओपन आयटीएफ एस100 वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत नीरज आनंद, रामाराव डोसा या खेळाडूंनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
एमएसएलटीए कॉम्प्लेक्स, कुमठणका, सोलापूर या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत 35वर्षांवरील पुरुष गटात अंतिम लढतीत अव्वल मानांकित नीरज आनंदने दुसऱ्या मानांकित सुजल महादेवनचा 6-2, 6-0 पराभव करून विजेतेपद पटकावले. दुहेरीत याच गटात नीरज आनंदने सुजल महादेवनच्या साथीत धनेश गायकवाड व मिलिंद मारणे यांचा 6-2, 6-1 असा पराभव करून विजेतेपद मिळवले.
दुहेरीत 45 वर्षांवरील पुरुष गटात राजेश दुसाने व चंद्रशेखर व्ही या जोडीने चन्नाबसवकुमार बाडीगंवर व दीपक पाटील यांचा 6-4, 2-6, 10-2 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. 55 वर्षांवरील पुरुष गटाच्या अंतिम फेरीत राजीव देसाई व पंकज शहा यांनी कुलदीप सिंग व पॉल वरघसे या अव्वल मानांकित जोडीचा 5-7, 6-4, 11-9 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. 70वर्षांवरील पुरुष गटात अंतिम फेरीत ताहीर अली व रामाराव डोसा यांनी रत्नाकरराव आनी व पर्वथेसम जिनागम यांचा 6-4, 6-0 असा पराभव करून विजेतेपद मिळवले.
स्पर्धेतील विजेत्यांना करंडक प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण उद्योगपती प्रियदर्शन शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयटीएफ सुपरवायझर वैशाली शेकटकर, संध्यारणी बंडगर , मोनिका आळंद , डॉ.बकुल जहागिरदार , दिलीप बच्चूवार , रणजित देसाई , नेव्हील पिठावाला, पल्लवी जहागीरदार व सुयश देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजीव देसाई यांनी केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
35वर्षांवरील पुरुष गट: अंतिम फेरी:
नीरज आनंद(भारत)[1] वि.वि.सुजल महादेवन(भारत)[2] 6-2, 6-0;
दुहेरी:35 वर्षांवरील पुरुष:अंतिम फेरी:
नीरज आनंद(भारत)/सुजल महादेवन(भारत)[2] वि.वि.धनेश गायकवाड(भारत)/मिलिंद मारणे(भारत)6-2, 6-1;
45 वर्षांवरील पुरुष: अंतिम फेरी:
राजेश दुसाने(भारत)/चंद्रशेखर व्ही(भारत)[1] वि.वि.चन्नाबसवकुमार बाडीगंवर(भारत)/दीपक पाटील(भारत)[2] 6-4, 2-6, 10-2;
55 वर्षांवरील पुरुष: अंतिम फेरी:
राजीव देसाई(भारत)/पंकज शहा(भारत)वि.वि.कुलदीप सिंग(भारत)/पॉल वरघसे(भारत)[1] 5-7, 6-4, 11-9;
दुहेरी: 70वर्षांवरील पुरुष गट: अंतिम फेरी:
ताहीर अली(भारत)/रामाराव डोसा(भारत)वि.वि.रत्नाकरराव आनी(भारत)/पर्वथेसम जिनागम(भारत)6-4, 6-0.