शुक्रवार रोजी (१९ नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा टी२० सामना रंगणार आहे. रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्पेल्क्सवर हा सामना पार पडेल. हा सामना जिंकत मालिकेत २-१ अशी विजयी आघाडी घेण्याचा यजमानांचा प्रयत्न असेल. तर पाहुणे दमदार पुनमरागमन करण्यासाठी झगडताना दिसतील. या सामन्यापूर्वी भारतीय प्रमाणवेळेनुसार ६.३० वाजता नाणेफेक झाली आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने या सामन्यातही नाणेफेक जिंकली असून त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानावर उतरेल.
या सामन्यात भारतीय संघाकडून वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आहे. त्याला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्याजागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. सिराजला पहिल्या टी२० सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. तसेच न्यूझीलंड संघात ३ बदल करण्यात आले आहेत. लॉकी फर्ग्युसन, रचिन रवींद्र आणि टॉड ऍस्टल यांना बाकावर बसवत ऍडम मिल्ने, जिम्मी नीशम आणि ईश सोधी यांना संधी दिली गेली आहे.
ALL. IN. READINESS! 👏 👏
3⃣, 2⃣, 1⃣ & Here We Go! 👍 👍
Follow the match ▶️ https://t.co/9m3WflcL1Y#TeamIndia #INDvNZ @Paytm pic.twitter.com/GVp49uV2Tg
— BCCI (@BCCI) November 19, 2021
भारतीय संघ : केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल
न्यूझीलंड संघ : मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), जि्म्मी नीशम, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी (कर्णधार), ऍडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट