भारताने न्यूझीलंडचा सात विकेट्स राखून पराभव केला ; केएल राहुल आणि रोहित शर्माच्या अर्धशतकांच्या जोरावर

रांची- शुक्रवार रोजी (१९ नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा टी२० सामना रंगला आहे. रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्पेल्क्सवर हा सामना सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने ६ विकेट्सच्या नुकसानावर १५३ धावा केल्या आहेत. यासह भारताला विजयासाठी १५४ धावांचे लक्ष्य मिळाले. १७.२ षटकातच ३ विकेट्सच्या नुकसानावर भारतीय संघाने हे आव्हान पूर्ण केले आणि ७ विकेट्सने सामना जिंकला. यासह त्यांनी मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

न्यूझीलंडच्या १५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्या जोडीने शानदार खेळी केल्या. या सलामीवीरांमध्ये पहिल्या विकेटसाठी ११७ धावांची भागिदारी झाली. राहुलने ४९ चेंडूंमध्ये सर्वाधिक ६५ धावा फटकावल्या. या खेळीदरम्यान त्याने २ षटकार आणि ६ चौकार मारले. तसेच रोहितनेही कर्णधार खेळी करत ५५ धावा जोडल्या.

रोहित आणि राहुलच्या विकेट गेल्यानंतर वेंकटेश अय्यर आणि रिषभ पंतने संघाच्या विजयाची जबाबदारी घेतली. प्रत्येकी १२ धावांची नाबाद खेळी करत त्यांनी १८ षटकांमध्येच संघाला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय भारतीय संघाच्या पथ्यावर पडला. भारतीय गोलंदाजाच्या सांघिक कामगिरीमुळे न्यूझीलंडचा एकही फलंदाज ३५ पेक्षा जास्त धावांचा टप्पाही ओलांडू शकला नाही. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ३४ धावा केल्या. तर मार्टिन गप्टिल आणि डॅरिल मिचेल या सलामीवीरांनी प्रत्येकी ३१ धावांचे योगदान दिले. परिणामी न्यूझीलंडला २० षटकअखेर १५३ धावा करता आल्या.

भारताकडून पदार्पणवीर हर्षल पटेलने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २५ धावा देत डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्सला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. हर्षलव्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार, दिपल चाहर, अक्षर पटेल आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी १ विकेट चटकावली.

हर्षल पटेलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

भारताने सामना चांगलाच आपल्या बाजूने खेचला आणि संपूर्ण सामन्यात चांगले क्रिकेट खेळले. [दव] आम्हाला माहित होते की ते ओले होणार आहे, दोन्ही संघांसाठी मैदान ओले होते. जेव्हा आम्हाला माहित होते की हा विजय आणि पराभवाचा घटक असेल, परंतु भारतीय संघाने आज उत्कृष्ट खेळ केला. आम्ही पुनरावलोकन करू, आम्ही परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करू.

केएल राहुल – न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी अतिशय जलद सुरुवात केली. त्यामुळे आम्ही आमच्या बाजूने गोष्टी परत मिळवणे महत्वाचे होते. त्यानंतर आमच्या गोलंदाजांनी बोलून निर्णय घेतला की, वेगात जर मिश्रण असेल तर ते प्रभावी ठरू शकते. सुरुवातीच्या स्टँडमध्ये, खेळपट्टी काय करत आहे हे पाहण्यासाठी आम्ही नेहमीच काही षटके देतो, त्यानंतर आम्ही कोणते शॉट्स खेळू शकतो, आम्हाला कोणत्या धावगतीने धावा काढायच्या आहेत याचे मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आपण अशी सुरुवात करतो आणि दहा विकेट्स हातात असतात तेव्हा आपण ठरवतो की आपल्याला गोलंदाजांवर आक्रमण करायचे आहे. रोहितने जगाला दाखवून दिले आहे की तो एक उत्कृष्ट फलंदाज आहे. त्याच्यासोबत फलंदाजी करणे नेहमीच चांगले असते.

रोहित शर्मा: संपूर्ण टीमचा हा एक चांगला प्रयत्न होता. आजच्या सामन्यात परिस्थिती तितकी सोपी नव्हती, पण ज्या प्रकारे आम्ही या परिस्थितीशी जुळवून घेतले ते खूप चांगले होते. फलंदाजी एकक म्हणून न्यूझीलंड संघाची गुणवत्ता आम्हाला माहीत आहे. आम्हाला आमच्या फिरकीपटूंची गुणवत्ता माहित आहे आणि आम्ही नेहमी गोष्टी आमच्या बाजूने खेचू शकतो. हा एक तरुण संघ आहे, अनेकांनी नाही तर अनेक सामने खेळले आहेत. भविष्यात संघात जे बदल घडतील, त्याबाबत आम्ही अद्याप विचार केलेला नाही. [हर्षल पटेल] त्याने काही वेळा चांगली कामगिरी केली आहे, अनेक वर्षांपासून तो प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत आहे, त्याला काय करायचे आहे हे त्याला माहीत आहे. तो खूप कुशल गोलंदाज आहे

You might also like

Comments are closed.