औरंगाबाद : विद्यापीठ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या क्रीडा स्पर्धेत शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व ४९ खेळांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी तसेच प्रयत्न करणार असल्याचे राज्यपाल नवनिर्वाचित सिनेट सदस्य पंकज भारसाखळे यांनी सांगितले. नुकतीच विद्यापीठामध्ये सिनेट बैठक संपन्न झाली यावेळी त्यांनी क्रीडा संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले.
विद्यापीठांतर्गत घेण्यात येणाऱ्या क्रीडा स्पर्धेत पूर्ण क्षमतेने खेळाडूंचा समावेश होत नसल्याने, भारसाखळे यांनी बैठकीत शासनाच्या निर्णयानुसार महिला व पुरुषांसाठी सर्व ४९ खेळांचा समावेश करण्यात यावा असा सवाल उ[स्थित केला होता. त्यांच्या या पाठपुरवठामुळे विद्यापीठाने या खेळांच्या आयोजनासाठी आर्थिक तरतूद देखील केलेली आहे. तसेच स्पोर्ट बोर्डचे गठन करून पूर्वी पुरुषांसाठी २७ व महिलांसाठी २० होत असलेल्या खेळांमध्ये सहा नवीन खेळाचा समावेश करण्यात येणार आहे.
दरम्यान, पंकज भारसाखळे यांनी सिनेट बैठकीमध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये दिली. ग्रीको रोमन कुस्ती(पुरुष), वेटलिफ्टिंग(महिला), सायकलिंग रोड(महिला व पुरुष), रस्सीखेच(महिला व पुरुष), ४९ पैकी राहिलेल्या खेळांचे देखील समाविष्ट आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेमध्ये करण्यात यावा यासाठी ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सिनेट बैठकीत पंकज भारसाखळे हे प्रयत्न करणार असून नवीन विद्यापीठ कायदा मधील ५८(ब) प्रमाणे विद्यापीठाने विविध खेळांच्या राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय एकविधा क्रीडा संघटनेशी MOU करून आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा व खेळाडूं उपयोगी विविध उपक्रम आयोजित करण्या बाबत देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे.