बेंगलोर समोर हैदराबादच्या आवाहन होते यामध्ये हैदराबाद ने गोलंदाजाच्या चांगल्या कामगिरीच्या बळावर चार धावांनी निसटता विजय मिळविला. या विजयामुळे पॉईंट टेबलवर जास्त फरक नाही पडला कारण बेंगलोर पहिले क्वालिफाय झाली आहे तर दुसरीकडे हैदराबाद स्पर्धेवर झालेली आहे. आज दोन सामने खेळला जाणार आहे तर पहिल्या सामन्यांमध्ये चेन्नई समोर पंजाबचे आव्हान असणार आहे.
बेंगलोर चा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. दोन्ही संघात एकही बदल करण्यात आला नव्हता. सलामीवीर जेसन रॉय व विल्यमसन यांच्या वगळता कोणीही चांगली फलंदाजी न केल्यामुळे हैदराबाद फक्त 141धावा करू शकला. तर बेंगलोर करून पुन्हा एकदा पर्पल कॅप होल्डर हर्षल पटेल यांने सर्वाधिक तीन गडी बाद केले.
धावांचा पाठलाग करीत असताना बेंगलोरची सुरुवात चांगली राहिली नाही कर्णधार विराट कोहली पाच धावा करून तंबूत परतला. पडिक्कल आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 41 व 40 धावा केल्या.यांना योग्य ती साथ मिळाल्यामुळे हैदराबाद ने निसटता विजय मिळविला आहे. तर हैदराबाद कडून सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी एक गडी बाद केला आहे. कर्णधार केन विल्यमसन सामनावीर ठरला आहे.