आज आयपीएल मध्ये हैदराबाद समोर दिल्लीचे आव्हान असणार आहे. यामध्ये हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघात बलाढ्य टी ट्वेन्टी प्लेयर असल्यामुळे दर्शकांना एक रोमांचक सामना पहावयास मिळणार आहे. दिल्लीकडून रबाडा, ऐनरीच, स्टोइनिस व हेटमायर हे चार विदेशी खेळाडू असणार आहे. तर हैदराबाद कडून कर्णधार विल्यमसन शिवाय वॉर्नर, राशिद व होल्डर हे चार विदेशी खेळाडू.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे-हैदराबाद-डेव्हिड वॉर्नर, वृद्धिमान सहा, केन विल्यमसन(कर्णधार),मनिष पांडे,जेसन होल्डर,अब्दुल समद,केदार जाधव,राशिद खान,भुवनेश्वर कुमार,संदीप शर्मा व खलील अहमद.
दिल्ली-पृथ्वी शौ,शिखर धवन,श्रेयस अय्यर(कर्णधार), रिषभ पंत,मार्कस स्टोइनिस,शिमरॉन हेटमायर,अक्षर पटेल,रविचंद्रन अश्विन,कागिसो रबाडा,एनरिच नॉर्टजे व आवेश खान