औरंगाबाद -इमोशनल इंटेलिजन्स टेस्ट मुळे खेळादरम्यान येणारे डिप्रेशन नर्वसनेस ,फ्री स्टेशन ,नकारात्मक विचार, अपयशामुळे वाढणारी भीती या सर्वांवर मात करण्यासाठी खेळाडूंना मदत होते, असे प्रतिपादन प्रख्यात चाइल्ड सायकॉलॉजिस्ट डॉक्टर निधी नावंदर यांनी असोसिएशन फॉर वुमन ई स्पोर्ट्स यांच्या वतीने खेळाडूंसाठी आयोजित समुपदेशन दरम्यान केले आहे.
उल्कानगरी येथील एक्सीडेलेंट कवायती ,अकॅडमीध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील खेळाडूंसाठी इमोशनल इंटेलिजन्स स्टेटस चे आयोजन असोसिएशन फोर वुमन इं स्पोर्ट्स आणि औरंगाबाद तायक्वांदो संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. असोसिएशन फोर वुमन इं स्पोर्ट्स घ्या अध्यक्ष नमिता दुगड आणि कोषाध्यक्ष डॉक्टर केजल भारसाखळे तसेच तायक्वांदो संघटनेचे सचिव लता तलवार आणि कोषाध्यक्ष अमोल थोरात यांची मंचावर यावेळी विशेष उपस्थिती होती.
सेल्फ अवरेनेस, मॅनेजिंग इमोशन्स, मोठी वेटिंग वनसेल्फ, एमफती आणि सोशल दिलच्या आधारावर असलेल्या डॅनियल गोलेमॅनची इमोशनल इंटेलिजन्स टेस्ट घेऊन प्राप्त झालेल्या गुणांनुसार खेळाडूंचे समुपदेशन करत त्यांच्या समस्यांचे निराकरण डॉक्टर निधी नावंदर यांनी केले. 120 हून अधिक खेळाडू या उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते तर खेळांमध्ये जास्तीत जास्त एकाग्रता, प्राविण्य व कौशल्य कसे मिळवता येईल यासाठी असोसिएशन फोर वुमन इं स्पोर्ट च्या वतीने हा उपक्रम खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तायक्वांदो कोच अंतरा अहिरे यांनी केले. तर हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतीक जांभुळकर, सागर वाघ, कोमल आगवाले, शरद पवार, राधिका शर्मा यांनी परिश्रम घेतले.