जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांची विभागीय चौकशी आज

औरंगाबाद (प्रतिनिधी): आपली मनमानी आणि स्वतःच्या मर्जीने एकतर्फी कारभार करत कर्मचारी आणि क्रीडा संघटनांच्या रोषास कारणीभूत ठरलेल्या औरंगाबाद येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची दि.१७ जून आज रोजी विभागीय चौकशी केली जाणार आहे, विशेष म्हणजे या चौकशीस त्या जर गैरहजर राहिल्या तर ही चौकशी एकतर्फी केली जाईल, अशा आषयाचे पत्र राज्य शासनाचे सहसचिव तथा प्रादेशिक चौकशी अधिकारी खालीद बी.अरब यांनी नावंदे यांना पाठविले आहे.

आर्थिक गैर व्यवहाराचा आणि शासनाची दिशाभूल ठपका असलेल्या औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश राज्यपालांच्या मार्फत ६ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आले आहे. औरंगाबाद प्रादेशिक विभागीय  चौकशी अधिकाऱ्यांच्या कडून करण्यात येणार असून यासाठी सदरकरता अधिकारी  म्हणून क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे येथील अनिल चोरमाले (उपसंचालक, मुख्यालय)  यांची नियुक्ती करण्यात आली आहे .तसेच याबाबतची माहिती शालेय व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई उपसंचालक क्रीडा व युवक विभाग यांना सुचित करण्यात आली आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांची करण्यात येणारी चौकशी  हि सातारा येथील २०१२ मधील प्रकरणापासून आणि अहमदनगर येथील २०१८-१९  तत्कालीन  जिल्हा क्रीडा अधिकारी असताना  नावंदे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यावेळेस  खात्या अंतर्गत चौकशी करण्यात आली होती . यामध्ये औरंगाबाद उपसंचालक उर्मिला मोराळे , माजी अमरावती उपसंचालक प्रतिभा देशमुख ,पुणे उपसंचालक प्रमोधिनी अमृतवाड यांच्यामार्फत २०१९ साली प्राथमिक चौकशी मधे नावंदे यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्यामुळे नावंदेची दुसऱ्यांदा खातेनिहाय चौकशी करण्यात आलेली आहे.

नावंदे यांची चौकशी करण्यात येत असताना हि चौकशी निपक्षपाती करण्या करिता निलंबित करून चौकशी करण्यात यावी असे  सातारा ,अहमदनगर  येथील सर्व  क्रीडा संघटनामार्फत मागणी करण्यात येत आहे .जिल्हा  सातारा,अहमदनगर येथे आर्थिक गैरव्यवहार आणि शासनाची दिशाभूलचा  ठपका ठेवण्यात आलेले  विभाग पुणे असताना  नावंदेची चौकशी औरंगाबाद विभागात का घेण्यात येत  आहे? असा संशयास्पद  प्रश्न क्रीडा प्रेमी मनात  निर्माण होत आहे.चौकशी दरम्यान मदतीकरता दूत यणार का ? हे पाहणे अतिउत्सुक्तेचे ठरणार आहे.

 

You might also like

Comments are closed.