औरंगाबाद(प्रतिनिधी):यावर्षी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मास्टर अथलेटिकस राज्यस्तरीय स्पर्धा औरंगाबादेत होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र ऐथलेटिक असोसिएशनचे अध्यक्ष आदिल सुमारिवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपाध्यक्ष माजी आमदार श्रीकांत जोशी, सचिव सुनील उचील, सहसचिव पंकज भारसाखळे, औरंगाबाद जिल्हा ऐथलेटिक असोसिएशनचे सचिव प्रा. डॉ . फुलचंद सलामपुरे, कोषाध्यक्ष माधव शेजवळ, डॉ.दयानंद कांबळे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र ऐथलेटिक असोसिएशनची वार्षिक दोन दिवसिय बैठक औरंगाबाद येथील एका हॉटेल मध्ये झाली, यात झालेले ठराव तसेच नियमांची माहितीही सुमारीवाला यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.यात वार्षिक स्पर्धा, डोपिंग बाबत काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा संघटनांना देण्यात आल्या.
पंचकुला (हरियाणा) येथील “खेलो इंडिया” स्पर्धेत ३× ४०० मिटर मध्ये सुवर्णपदक पटकावणारी औरंगाबाद जिल्हा संघाची राष्ट्रीय धावपटू साक्षी चव्हाण यांचा सुमारिवाला यांच्या हस्ते रोख दहा हजार रुपये देऊन सत्कार करण्यात आला.