औरंगाबाद(प्रतिनिधी): क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च चळवळ म्हणून ऑलिम्पिक कडे पाहिले जाते. 23 जून हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन सर्व जगभर उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने औरंगाबाद शहरात ऑलिंपिकचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, विभागीय क्रीडा संकुल समिती औरंगाबाद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन निमित्ता विविध उपक्रम
1)सायकल रॅली श्री गजानन महाराज मंदिर चौक येथून सकाळी सात वाजता सुरू होईल.
2)ऑलिम्पिक मशाल रॅली श्री गजानन महाराज मंदिर चौक ते विभागीय क्रीडा संकुल पर्यंत संपन्न होईल.
3) रॅलीचा समारोप 8.30वाजता विभागीय क्रीडा संकुल येथे होईल यामध्ये औरंगाबाद शहरातील यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय गुणवंत खेळाडूंचा सत्कार समारंभ होईल.
4) दिनांक 23 ते 25 जून दरम्यान जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा शिवछत्रपती कॉलेज येथे संपन्न होईल.
5) दिनांक 23 ते 24 जून दरम्यान जिल्हास्तरीय स्केटींग स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल याठिकाणी संपन्न होईल.
तसेच योगा, मल्लखांब, कराटे, स्केटिंग, तलवारबाजी आधी खेळांचे प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत.सायकल रॅली व मशाल रॅलीचे उद्घाटन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते संपन्न होणार असून रॅलीच्या समारोपप्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू चा सत्कार समारंभ वस्तू व सेवा कर विभागाचे आयुक्त जी.श्रीकांत यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
वरील उपक्रमांमध्ये औरंगाबाद शहरातील खेळाड, विद्यार्थी, क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक ,क्रीडा संघटक व क्रीडाप्रेमींनी सहभागी व्हावे.असे आवाहन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, विभागीय क्रीडा संकुल समिती, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, औरंगाबाद व शहरातील सर्व एकविध क्रीडा संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे.
ऑलम्पिक दिन उत्साहात संपन्न होण्यासाठी यशस्वितेसाठी क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे सदस्य व समन्वयक डॉ. उदय डोंगरे, क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सचिव गोविंद शर्मा, महाराष्ट्र स्क्वॅश संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप खांडरे, श्री आशुतोष मिश्रा, महाराष्ट्र जिम्नास्टिक संघटनेचे सचिव डॉ. मकरंद जोशी, महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटनेचे कोषाध्यक्ष अभय देशमुख, क्रीडा भारती शहर मंत्री डॉ. संदीप जगताप, जिल्हा योग संघटनेचे सुरेश मिरकर, गोकुळ तांदळे, स्वप्नील तांगडे, सागर मगरे, स्केटिंग सायकलिंग संघटनेचे भिकन आंबे, जिल्हा वुशु संघटनेचे महेश इंदापुरे, डॉ. विजय व्यवहारे, अरुण भोसले, कैलास जाधव, कैलास वाहुळे, विनायक राऊत, डॉ. दिनेश वंजारे, डॉ. श्रीनिवास मोतीयेळे, डॉ. रोहिदास गाडेकर, राकेश खैरनार, अनिल मिरकर, डॉ. श्रीनिवास मोतीयेळे, डॉ. अभिजीत देशमुख, डॉ. कैलास शिवणकर आदी प्रयत्न करीत आहे.