आज शनिवारी आयपीएल मध्ये दर्शकांना दोन सामने बघावयास मिळणार आहे. तर दुसऱ्या सामन्यांमध्ये हैदराबाद समोर पंजाबच्या आव्हान असणार आहे. यामध्ये हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबाद संघाने संघात कोणताही बदल केला नाही तर दुसरीकडे मात्र पंजाबने संघात तब्बल तीन बदल केले आहे. स्टार खेळाडू युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलची या सामन्यात वापसी झाली आहे यामुळे पंजाब ची फलंदाजी भक्कम झाली आहे. तसेच एलिस आणि बिष्णोई यांनाही संघात घेतले आहे. तर ऐलन, फॉरेन व रशीद यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. डेव्हिड वॉर्नर विरुद्ध क्रिस गेल हा सामना रंगतदार ठरणार आहे.
दोन्ही संघ पुढील प्रमाणे-
पंजाब-के एल राहुल, मयंक अग्रवाल, क्रिस गेल, निकोलस पूरन, एडन मार्करम,दीपक हूडा, रवी बिशनोई, मोहम्मद शमी, हर्षदीप ब्रार, अर्शदीप सिंह, नॅथन एलिस.
हैदराबाद-डेव्हिड वॉर्नर, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, मनिष पांडे, केदार जाधव,अब्दुल समद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा,. खलील अहमद