आयपीएल मध्ये चेन्नई समोर बेंगलोर चे आव्हान होते. यामध्ये गोलंदाजांनी तसेच फलंदाजीने केलेल्या शानदार कामगिरीच्या बळावर चेन्नईने बेंगलोरला सहा विकेटने पराभूत केले. यामध्ये महत्वाचे तीन विकेट घेणारा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो सामनावीर ठरला. या विजयासह चेन्नई पॉईंट्स टेबल मध्ये अव्वल स्थानावर आला आहे. तर दुसरीकडे आरसीबी तिसऱ्या क्रमांकावर आहे.
नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.तर आर सी बी च्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र याचा फायदा त्यांना घेता आला नाही.चांगली गोलंदाजी केल्यामुळे चेन्नई आरसीबी ला 156 धावतच रोखले. धावांचा पाठलाग करीत असताना चेन्नईला सलामीवीरांनी धडाकेबाज सुरुवात करून दिली. मागच्या सामन्यातला सामनावीर महाराष्ट्रीयन खेळाडू ऋतुराज गायकवाड या सामन्यामध्ये पण चमकला. त्याने 31 धावा केल्या तर फाफ डु प्लेसिस ने सर्वाधिक 38 धावा केल्या. रायडू ने 32 तर मोइन अली ने देखील 23 धावांचे योगदान दिले. आरसीबी कडून पर्पल कॅप दारी हर्षल पटेल दोन तर मॅक्सवेल व चहलने प्रत्येकी एक गडी बाद केला. तर उद्या दिल्ली समोर राजस्थानचे आव्हान असणार आहे.