औरंगाबाद – गेल्या वर्षभरात अनेक स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या तेजस शिरसे या औरंगाबादकर धावपटूला महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स संघटनेचे सहसचिव पंकज भारसाखळे यांनी पंचवीस हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य देऊ केले आहे.
भविष्यात आवश्यकता असल्यास सर्वतोपरी साहाय्य केले जाणार असल्याचे वचन यावेळी पंकज भारसाखळे यांनी तेजस याला दिले.
देशाच्या अॅथलेटिक्स नकाशावर आपले नाव कोरणाऱ्या तेजस शिरसे या धावपटूला राज्य अॅथलेटिक्स संघटनेचे सहसचिव पंकज भारसाखळे यांनी मदत देऊ केली आहे.
अनेक स्पर्धात आपले नाव कोरणार्या तेजसला नुकतेच पंचेवीस हजारांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. तेजस नुकतेच साठाव्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत विजेतेपदाचा गवसणी घातली. त्याने ११० मीटर अडथळाशर्यत (हर्डेल) मध्ये १४. ०९ सेकंदात पूर केला. विशेष म्हणजे, १९ वर्षांखालील गटात असलेल्या तेजसने खुल्या गटात हे सुवर्णपदक जिंकले.
यापूर्वी गत महिन्यात झालेल्या फेडरेशन कप स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक प्राप्त केले होते. हे साहाय्य प्रदान करताना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुरेंद्र मोदी यांची उपस्थिती होती.
तेजसची उपलब्धी..
२०१८- शालेय राष्ट्रीय चॅंपियनशिप (१७ वर्षे गट) – सुवर्णपदक
२०१९- खेलो इंडिया (१७ वर्षे गट) – रौप्य पदक, फेडरेशन ऍथलेटिक्स स्पर्धा- सुवर्णपदक (आशियातील दुसरी सर्वोत्तम कामगिरी),
२०२०- दक्षिण आफ्रिकेत अनेक आमंत्रित स्पर्धात सहभाग. फेडरेशन काप २०२१- सुवर्णपदक. नैरोबी (केनिया येथील) जागतिक स्पर्धेत पाचवे स्थान.