आज आयपीएल मध्ये दोन सामने आहे तर यामध्ये पहिल्या सामन्यांमध्ये गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या बळावर दिल्लीने राजस्थानला 33 धावांनी पराभूत करत पॉइंट टेबल मध्ये अव्वल स्थान गाठले आहे.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनची एकाकी झुंज अपयशी ठरली आहे. त्याने 70 धावा केल्या मात्र दुसऱ्या बाजूने त्याला साथ न मिळाल्याने राजस्थानचा पराभव झाला.
नाणेफेक जिंकत राजस्थानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यांचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरविला, प्रथम फलंदाजी करत असताना दिल्लीने 154 धावा केल्या, दिल्लीकडून सर्वाधिक श्रेयस अय्यर ने 43 तर कर्णधार रिषभ पंत ने 24 धावांचे योगदान दिले.
गोलंदाजीमध्ये मुस्तफिजुर रहमान व चेतन साकरीयाने प्रत्येकी दोन गडी बाद केले. धावांचा पाठलाग करीत असताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. अवघ्या 6 धावातच सलामीवीर तंबूत परतले होते. कर्णधार संजू सॅमसंग एक बाजूने मात्र उभा होता, मात्र त्याला योग्य अशी साथ मिळाली नाही, त्यामुळे संघाचा पराभव झाला. त्याने सर्वाधिक 70 धावा केल्या. तर दिल्लीकडून एनरीच ने 2 आवेश, अक्षर, अश्विन रबाळा ने प्रत्येकी एक गडी बाद केले.