ऑलिंपिक संघटनेतर्फे खेळाडूंचा होणार गौरव

संभाजीनगर(प्रतिनिधी): राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद जिल्हा ऑलिंपिक संघटनेतर्फे २९ ऑगस्ट रोजी आपल्या ऐतिहासिक शहराचे नाव यशोशिखरावर नेणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे. क्रीडा-भारतीच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या सोहळ्यात २०२१-२२ या दरम्यान राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे जिल्ह्यातील खेळाडू पात्र ठरणार असून, आंतरविद्यापीठ स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंचा देखील यावेळी यावेळी गौरव करण्यात येणार आहे.

एवढेच नवे तर खेळो इंडिया अंतर्गत विविध स्पर्धेतील पदक विजेते विजेत्या औरंगाबादच्या खेळाडू व मार्गदर्शकांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. या सत्कार सोहळ्यासाठी २०२१-२२ यादरम्यान राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंनी आपल्या प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रतिसह आपआपल्या एकविधा खेळ संघटनेच्या सचिवा कडे आपले नावे २५ ऑगस्ट पर्यंत नोंदवावे व सम्बंधित खेळांच्या सचिवांनी ती नावे २६ ऑगस्ट पर्यंत संघटनेचे सहाचिव डॉ.दिनेश वंजारे(९३२६२०३७४१) यांच्या कडे आपल्या लेटर हेडवर सादर करावीत.

 

तसेच एकविधा खेळ संघटनेच्या सचिवान कडून आलेलीच नावे स्वीकारली जातील याची खेळाडूंनी नोंद घ्यावी.या सत्कार सोहळ्यात जास्तीस जास्त खेळाडूंनी नाव नोंदवावे, असे आवाहन औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटना व क्रीडा-भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, उपाध्यक्ष उदय डोंगरे, मकरंद जोशी, फुलचंद सलामपुरे, विनोद नरवडे, गोविंद शर्मा, प्रदीप खांड्रे, कुलजितसिंग दरोगा, भिकन आंबे, सुरेश मिरकर, दिनेश वंजारे, संदीप जगताप, नीरज बोरसे, मंजितसिंग दरोगा, सिद्धार्थ पाटील, लता कलवार, हेमंद्र पटेल, रणजित भारद्वाज, विश्वास जोशी, महेश इंदापूरे, चरांजीतसिंघ संघा आदींनी केले आहे.

You might also like

Comments are closed.