छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी): शहर पोलिस दलातर्फे आयुक्तालयातील कवायत मैदानावर २८ व्या पोलिस घटक क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी (ता.२४) मुख्यालयातील उपायुक्त अपर्णा गिते यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत पोलिस दलाच्या मुख्यालय विभाग, सिडको विभाग, उस्मानपूरा विभाग, शहर विभाग आणि छावणी विभागाचे संघ सामील झाले होते. विशेष म्हणजे स्पर्धेचे उद्घाटन होताच व्हॉलीबॉल, फुटबॉल आणि कब्बडी या स्पर्धा पार पडल्या, दोन खेळात मात्र मुख्यालय विभागाचा पराभव झाला.
स्पर्धेच्या उद्घाटनादरम्यान परिमंडळ दोनचे उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त बालाजी सोनटक्के, सहायक आयुक्त (गुन्हे) विशाल ढुमे, सहायक आयुक्त अशोक थोरात यांच्यासह पोलिस निरीक्षक, स्पर्धेक खेळाडून पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. व्हॉलीबॉलचा पहिला सामना मुख्यालय विरुद्ध शहर विभाग यांच्यात खेळविण्यात आला. यात शहर विभागाने २-१ सेटच्या फरकाने मुख्यालयाचा पराभव केला. या सामन्यात सहायक आयुक्त विशाल ढुमे, पोलिस नाईक अखिल मोमीन यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.
तसेच मुख्यालय विभागातून निरीक्षक गौतम पातारे, नाईक सुनील जाधव यांनी चांगली खेळी केली. फुटबॉल सामन्यातही सिडको विभागाने मुख्यालयाचा १-० ने पराभव केला. विजय संघातून अंमलदार अबुजर यांनी एकमेव गोल करुन संघाला विजय मिळवून दिला. कब्बडीत मात्र मुख्यालयाने शहर विभागाचा २५-२३ या फरकाने पराभव केला. यात अंमलदार अतुल सोळंकी, विकास चव्हाण, गजानन तारे यांनी चांगली खेळी केली. तसेच महिला व्हॉलीबॉल सामन्यात मुख्यायल विभागाने सिडको विभागाचा २-१ सेटच्या फरकाने विजय मिळविला. यात उपनिरीक्षक श्रीमती बागुल, रुपाली राणे, हिना पठाण, अश्विनी वाघ, माला सलामपूरे यांनी उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन केले, अशी माहिती पोलिस उपायुक्त विशाल ढुमे यांनी दिली.
पोलीस मुख्यालय औरंगाबाद शहर येथे पोलीस घटक क्रिडा स्पर्धा सुरु असून स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या बास्केटबॉलमध्ये पोलीस मुख्यालयाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मुख्यालयाने सिडको विभागाचा ३०- २२ अशा फरकाने पराभव केला. तसेच महिला बास्केटबॉलमधे शहर विभागाने छावणी विभागाला २०-१५ या फरकाने मात दिली. दोन्ही संघाकडून अनुक्रमे सुशांत शेळके, शिवाजी शिंदे, प्रशांत बुरडे, विरेश बने, विजय पिंपळे, अतुल तुपे, संदीप क्षिरसागर, विजय गाडे, अल्ताफ पठाण यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तसेच विजयी महिला संघाकडुन उज्वला सलामपुरे, सुप्रिया मुरकूटे, मनिषा पवार, प्राप्ती साठे, नेहा वायवट यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून संघाला विजय मिळवून दिला.
हँडबॉल स्पर्धेतही मुख्यालय संघाने छावणी संघाचा २-० असा पराभव करीत विजय मिळविला. मैदानी स्पर्धेत लांब उडीत कृष्णा घोडके यांनी प्रथम तर गणेश तरडे यांनी व्दितीय तसेच महिला लांब उडीत योगीता जमादार यांनी प्रथम तर स्वाती गाडेकर यांनी व्दितीय क्रमांक पटकावला. २०० मीटर धावण्याचे स्पर्धेत रियाज शेख प्रथम तर विजय आहेर व्दितीय तसेच महिला मध्ये स्वाती गाडेकर, प्रथम तर मीना जाधव व्दितीय क्रमांक पटकावला. ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सलमान शेख यांनी प्रथम तर युवराज आहेर यांनी व्दितीय क्रमांक पटकावला.
महिला कबड्डीतही मुख्यालयाचाच दबदबा
महिला कब्बडीतही मुख्यालय संघाने छावणी संघाचा १९-२४ अशा पाच गुणांच्या फरकाने विजय मिळविला. विजयी संघाकडुन सुमन पवार, मनिषा पवार यांनी उत्कृष्ट खेळी केली. पुरुष हॉकी मध्ये शहर विभाग विरुध्द मुख्यालय विभाग संघाचा ३-२ असा गुण फरकाने विजय मिळवीला. त्यामध्ये अजय व्यवहारे यांनी २ गोल तर आजम शेख यांनी गोल केला. विजयी संघाला कोच किशोर परदेशी यांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धांच्या यशस्विततेसाठी राखीव पोलिस निरीक्षक प्रशांत सुगरवार, उपनिरीक्षक पानपाटील, क्रीडा प्रमुख शेख जिलानी हे परिश्रम घेत आहेत.