• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, October 11, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

हॉकी स्पर्धेच्या सलग दुसऱ्या सामन्यात भारताने मारली बाजी!

by pravin
February 2, 2022
in बातम्या
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मस्कत : ड्रॅग-फ्लिकर गुर्जित कौरच्या (तिसऱ्या मिनिटाला, ४९व्या मि.) नेत्रदीपक कामगिरीमुळे भारताच्या महिला संघाने मंगळवारी सलग दुसऱ्या सामन्यात चीनवर २-१ असा विजय मिळवत ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकी स्पर्धेच्या गुणतालिकेत अग्रस्थान प्राप्त केले आहे.

भारताने सोमवारी सलामीच्या सामन्यात चीनवर ७-१ असा शानदार विजय मिळवला. याच संघाला पुन्हा दुसऱ्या सामन्यात हरवताना गोलवर्षांवापेक्षा सावध पवित्रा पाहायला मिळाला. भारत आणि नेदरलँड्स यांच्या खात्यांवर दोन सामन्यांतून प्रत्येकी ६ गुण जमा आहेत. पण भारताने गोलफरकाच्या बळावर सरशी साधली आहे.

सामना सुरू झाल्यापासून चीनच्या खेळात अनुभवाचा अभाव आढळला. पहिल्या सत्रात चेंडूवर ताबा, पास करण्यातील गफलत याचा फटका चीनला बसला. भारतीय संघाने मात्र आत्मविश्वासाने खेळ करीत सामन्याची पकड निसटू दिली नाही. भारताने चीनच्या बचावावरील दडपण सुरुवातीपासून निर्माण केले. सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला गुर्जितने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतरण करीत भारताचे खाते उघडले. भारताकडून गोलच्या आणखी काही संधी निर्माण झाल्या, परंतु चीनची गोलरक्षक वू सुराँगने त्या हाणून पाडल्या. दुसऱ्या सत्रातही चीनने भारताला गोल करू दिला नाही. त्यामुळे पूर्वार्धात भारताकडे १-० अशी आघाडीच मर्यादित राहिली.

तिसऱ्या सत्रात ३९ मिनिटाला शुमिन वँगने भारतीय बचाव आणि गोलरक्षक सविताला चकवून चीनच्या खात्यावर पहिला गोल जमा केला. मग चौथ्या सत्रात ४९व्या मिनिटाला गुर्जितने पेनल्टी कॉर्नरद्वारे दुसरा गोल झळकावून भारताला आघाडी मिळवून दिली. मोनिकाला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.

Tags: -second-in-a-row-womenHockey
ShareTweetSend
Next Post

महाराष्ट्राच्या अर्जुनचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात ;

ताज्या बातम्या

R Ashwin speaking about Team India bowling weakness

टीम इंडियाचा पराभव का होतोय? आर. अश्विनने उघड केली सर्वात मोठी चूक

sports-panorama logo

IUSF: विद्यापीठ स्तरावरील खेळांमध्ये बदलाची नवी आशा

Shreyas Iyer on India's defeat against West Indies in 2nd T20

रांचीमध्ये २४९ धावा करूनही भारताचा पराभव; कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितली गोलंदाजांची मोठी चूक

Arunachal Pradesh cricket team likely to pull out of Ranji Trophy match against Nagaland

रणजी करंडक 2026-27: अरुणाचल प्रदेशचा संघ नागालँडविरुद्धच्या सामन्यातून माघार घेण्याच्या तयारीत

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.