औरंगाबाद(प्रतिनिधी): २१ व्या राज्यस्तरीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेमध्ये औरंगाबाद संघाने १७ सुवर्णपदकांची कमाई केली तसेच राष्ट्रीय स्पर्धे साठी औरंगाबाद मधुन २७ खेळाडूंची निवड झाली.५ व ६ मार्च दरम्यान जळगाव या ठिकाणी झालेल्या औरंगाबाद संघाने १७ सुवर्ण व ०२ रोपे पदकांची कमाई केली या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदक औरंगाबाद संघाने मिळवले तसेच सर्व वयोगटा औरंगाबाद संघ विजय ठरला व साघिक विजेतेपद औरंगाबाद संघाने आपल्या नावे केले.
या स्पर्धा चार वयोगटांमध्ये घेण्यात आल्या होत्या नॅशनल डेव्हलपमेंट,सब ज्युनियर ,ज्युनियर व वरिष्ठ गट या सर्व वयोगटांमध्ये औरंगाबादच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये आर्य शहा ,अनिकेत चौधरी,गौरी ब्राह्मणे,आर्यन फुले, अक्षया कलंत्री यांनी उत्कृष्ट कामगिरी केली तसेच या स्पर्ध मधून महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली त्यात जवळपास औरंगाबादच्या २७ खेळाडूंची महाराष्ट्र संघांमध्ये निवड झाली. २६ ते २७ मार्च दरम्यान बेंगलोर कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेसाठी २३ मार्च रोजी शेगाव येथून संघ रवाना होणार आहे.
तसेच जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र जिम्नॅस्टिक्स संघटनेचे तांत्रिक समिती सदस्य तसेच औरंगाबाद जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष आदित्य जोशी यांनी स्पर्धा प्रमुख म्हणून काम पाहिले तसेच अमेय जोशी, सिद्धार्थ कदम,मयूर बोंढारे, निशा महाजन,तनुजा गाढवे,अनघा खैरनार यांनी पंच म्हणून काम पाहिले या संघाबरोबर प्रशिक्षक म्हणून मनीष थट्टेकर आणि सर्वेश भाले हे गेले होते.तसेच संघ व्यवस्थापक म्हणून दिपाली बजाज या होत्या.
या सर्व विजयी संघाला तसेच बेंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना व राज्यस्तरीय एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केल्या बद्दल महाराष्ट्र जिम्नॅस्टिक्स संघटनेचे सचिव डॉ.मकरंद जोशी तसेच औरंगाबाद जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड. संकर्षण जोशी,उपाध्यक्ष डॉ.रणजीत पवार,सचिव हर्षल मोगरे,कोषाध्यक्ष सागर कुलकर्णी,डॉ.विशाल देशपांडे,रोहित रोंगे,संदीप गायकवाड,राहुल तांदळे आदींनी सर्व पदक विजेत्या खेळाडूंना व प्रशिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
संघ खालीलप्रमाणे:-
नॅशनल डेव्हलपमेंट गट
१) पुरुष एकेरी – सुवर्ण
आर्यन फुले
२) महिला एकेरी- सुवर्ण
अक्षया कलंत्री
३) मिश्र दुहेरी- सुवर्ण
अक्षया कलंत्री
ओम सोनी
३)मिश्र तिहेरी -सुवर्ण
ओम सोनी
अद्वैत काचेवार
इशिका बजाज
सब ज्युनियर गट
१)पुरुष एकेरी – सुवर्ण
अनिकेत चौधरी
२) महिला एकेरी – सुवर्ण
गौरी ब्राह्मणे
३) मिश्र दुहेरी- सुवर्ण
अनिकेत चौधरी
गौरी ब्राह्मणे
४) मिश्र तिहेरी – रौप्य
विश्वेश पाठक
अनुराग देशमुख
गीत भालसिंग
५) ग्रुप – सुवर्ण
विश्वेश पाठक
अनुराग देशमुख
गीत भालसिंग
रिया नाफडे
सानवी सौंदळे
ज्युनियर गट
१)पुरुष एकेरी – सुवर्ण
आर्य शहा
२) महिला एकेरी
राधा सोनी
३) मिश्र दुहेरी – सुवर्ण
स्मिथ शहा
राधा सोनी
४) मिश्र तिहेरी – सुवर्ण
स्मिथ शहा
अद्वैत वजे
देवेश कातनेश्वरकर
वरिष्ठ गट
१)पुरुष एकेरी – सुवर्ण
गौरव जोगदंड
२) महिला एकेरी – सुवर्ण
रिची भंडारी
३) मिश्र दुहेरी – सुवर्ण
ऋग्वेद जोशी
साक्षी लड्डा
४) मिश्र तिहेरी – रोप्य
गौरव जोगदंड
धैर्यशील देशमुख
संदेश चितलवाड
५) ग्रुप – सुवर्ण
ऋग्वेद जोशी
धैर्यशील देशमुख
संदेश चितलवाड
अभय उंटवाल
उदय मेधेकर
६) ऐरो डान्स – सुवर्ण
ऋग्वेद जोशी
धैर्यशील देशमुख
संदेश चितलवाड
अभय उंटवाल
उदय मेधेकर
साक्षी लड्डा
रिची भंडारी
सिल्वी शहा