औरंगाबाद(प्रतिनिधी): विधी मंडळातील विजय ऊर्फ भाई गिरकर यांनी आज विधान परिषदेत क्रीडा क्षेत्राशी संबंधीत लक्षवेधी उपस्थित केली होती. या चर्चेत पदवीधर आमदार सतीश चव्हाण सहभाग घेतला. राज्यातील खेळाडूंना उल्लेखनीय कार्याबद्दल ज्यावेळी शासनाचा क्रीडा पुरस्कार दिला जातो त्याच वेळी त्या खेळाडूला शासकीय सेवेत थेट नियुक्ती द्यावी, क्रीडा शिक्षकांची भरती करताना क्रीडा शिक्षक हा खेळाडूच असायला हवा.
यासाठी शालेय शिक्षण विभागाकडे पाठुपरावा करून अधिवेशन संपायच्या आधी धोरणात्मक निर्णय घ्यावा, राज्यात विविध तालुक्याच्या ठिकाणी दीड-दोन कोटी रूपय खर्च करून क्रीडा संकुले उभारण्यात आली आहेत. मात्र त्याठिकाणी खेळाडूंसाठी कुठलेच क्रीडा सहित्य उपलब्ध करून दिल्या जात नाही. त्यामुळे हे क्रीडा संकुले पांढरा हत्ती ठरू नये यासाठी क्रीडा संकुलांच्या उद्घाटनाआधीच सर्व क्रीडा साहित्य त्याठिकाणी उपलब्ध करून द्यावे,
तसेच तेथे क्रीडा प्रशिक्षकांची देखील नियुक्ती करावी अशा विविध मागण्यांव्दारे मी सभागृहाचे लक्ष वेधले.क्रीडा मंत्री सुनीलजी केदार यांनी शासनाचा क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नोकरी देण्यासंदर्भात दोन महिन्यात सकारात्मक निर्णय घेण्याचे सभागृहास आश्वस्त केले. तसेच जिल्हा क्रीडा समितीचे अध्यक्ष हे यापूर्वी जिल्हाधिकारी असायचे, त्यात शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन यापुढे जिल्हा क्रीडा समितीचे अध्यक्ष हे पालकमंत्री असणार आहेत. त्यामुळे डीपीडीसीच्या माध्यमातून तालुका क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी आवश्यक ते क्रीडा साहित्य उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे देखील क्रीडा मंत्री सुनीलजी केदार यांनी सभागृहात सांगितले.
तर क्रीडा राज्य मंत्री आदितीताई तटकरे यांनी क्रीडा विभागाने जो प्रस्ताव ठेवला आहे त्यात शासकीय सेवेत थेट नियुक्ती अथवा 5 टक्के आरक्षणानुसार नियुक्ती मिळणार्या खेळाडूंना तालुका क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत केले जाणार असल्याचे सभागृहात सांगितले.