राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक क्रीडा ज्योत संभाजीनगरमध्ये फिरणार

संभाजीनगर(प्रतिनिधी): राज्यात क्रीडामय वातावरण निर्माण करून विविध खेळांना उत्तेजन देण्याच्या उद्देश्याने तसेच खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हावी व राष्ट्रीय स्पर्धेच्या दृष्टीने खेळाडूंची तयारी व्हावी याकरीता राज्यात महाराष्ट्र स्टेट ऑलिंपिक गेम्स चे आयोजन महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे.
संभाजीनगर येथे तलवारबाजी या खेळाची स्पर्धा आयोजित करण्यास शासनाने निर्देशित केलेले आहे. सदर स्पर्धा दिनांक ०५ ते ०८ जानेवारी २०२३ या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल,गारखेडा , संभाजीनगर येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,संभाजीनगर व महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटना यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्याचे निश्चित केलेले आहे.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सर्व विभागातून खेळाडू सहभागी होणार आहे. राज्यस्तरीय मिनि ऑलिंम्पिक क्रीडा स्पर्धांचे प्रसार व प्रचार करण्यासाठी, जास्तीत जास्त नागरीकाना खेळाची ओळख व आवड निर्माण होण्याकरीता क्रीडा ज्योत रॅली आज दि. 30 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8.00 वा. विभागीय क्रीडा संकुल-गजानन मंदिर-सिडको बसस्टँड-बळराम पाटील हायस्कुल- जिल्हाधिकारी कार्यालय- शहागंज-क्रांती चौक येथून बाबा पेट्रोल पंप या मार्गावर करण्याचे निर्देशित केले आहे.
तसेच या रॅलीमध्ये विविध क्रीडा संघटना, राष्ट्रीय छात्र सेना विद्यार्थी, भारत स्काऊट गाईड विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बाजीराव देसाई, जिल्हा क्रीडा अधिकारी, यांनी केले आहे.
क्रीडा ज्योत मार्ग व वेळ
Comments are closed.