संभाजीनगर(प्रतिनिधी) : महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेच्या वतीने ५ ते ८ जानेवारी दरम्यान पुणे बालेवाडी येथे मिनी ऑलम्पिक स्पर्धा अंतर्गत हॉकी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेकरिता औरंगाबाद जिल्ह्याच्या संघाची घोषणा संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे यांनी केली.
हॉकी महाराष्ट्रच्या सहकार्याने आयोजीत या स्पर्धेमध्ये राज्यभरातून सर्वोत्तम ८ पुरुष व महिला संघ सहभागी होत असून औरंगाबाद संघास या मध्ये पात्रता मिळाली आहे. मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी आचल सिरसागर तर मुलांच्या संघाच्या कर्णधारपदी इमरान शेख यांची निवड करण्यात आली आलेली असून निवडण्यात आलेल्या औरंगाबाद जिल्ह्याचा संघ पुढीलप्रमाणे आहे.
महिला संघ: आचल शिरसागर, निर्जला शिंदे, भाग्यश्री शिंदे, शालिनी साकुरे, दिपाली आगासे, निशा भोयर, कीर्ती ढेपे, अनिता शर्मा, पूनम वाणी, श्रुती विधाते, गौरी मुखाने, नाजूका मोहिते, अक्षदा सूर्यवंशी, अर्चिता सूर्यवंशी, भाग्यश्री वराडे, प्रियंका वाहूळ, विशाखा साळवे, प्रतिमा शेट्टी. संघ प्रशिक्षक- किशोर परदेशी व व्यवस्थापक- संजय तोतावाद.
पुरुष संघ: रिजवान शेख, अथर्व वाघमारे, इमरान शेख, पवन मंडोरे, जाहीर शेख, कलीम शेख, दीपक बन्सीवाल, रिजवान शेख, नीरज शिरसाठ, समीर शेख, पवन ढाकणे, अकबर खान, प्रकाश दरेकर, प्रथमेश पाटील, शुभम आहेर, फादर शेख, देव तुर्की, अक्रम खान. संघ प्रशिक्षक- जाकिर यार खान व व्यवस्थापक- तोसीब मिर्झा.
या सर्व खेळाडूंना हॉकी संघटनेचे अध्यक्ष मा.आ.श्रीकांत जोशी, उपाध्यक्ष अशोक साय्यना, दिनेश गंगवाल, सहसचिव श्यामसुंदर भालेराव, आजम शेख यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.